ज्ञानाच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर :- विद्यापिठ हे ज्ञानाचे मंदिर आहे. या मंदिरात आपला सर्वांचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.            छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा उभारणी भूमिपूजन समारंभ आज नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते झाल्यानंतर वसंतराव देशपांडे सभागृह येथे मुख्य कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अनिल देशमुख, विधानपरिषदेचे आमदार अभिजित वंजारी, आमदार मोहन मते, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, तांजावर येथील श्रीमंत शिवाजी राजे भोसले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले, सचिव प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, मंगेश डुके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.            ज्ञानाच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा होत असल्याने येत्या काळात विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्‍या जिवनावरील साहित्य येथे उपलब्ध होईल. विद्यापीठ परिसरामध्ये ऑडिट्रोरियम सेंटर उभारण्यात येणार आहे. मला आनंद आहे की, या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनाचे चरित्र उपलब्ध होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रसंताची ग्रामगीता, ज्ञानेश्वरी हे सर्व ग्रंथ डिजीटल करण्यात येईल. त्याचा प्रभावीपणे वापर पुढील पीढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.           राष्ट्रसंतांच्या नावाप्रमाणेच विद्यापीठातील छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रेणादायी ठरेल. ज्ञानाने परिपूर्ण असणारी पिढी निर्माण करायची असल्यास शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांच्या समोर ठेवणे गरजेचे आहे. लोकसहभागातून पुतळा उभारण्यात येणार आहे. लोकसहभाग हा चळवळीचा भाग आहे. प्रत्येक व्यक्ती व संस्थेने यामध्ये पुढाकार घ्यावा व स्मारक समितीच्या या कार्याला मदत करावी असे ते यावेळी म्हणाले. यावेळी श्रीमंती प्रिंस शिवाजी राजे भोसले व डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मुर्तिकार सोनल कोहाड, वृषभ बंसल आणि गौरव डुबेवार यांचा सत्कार नितीन गडकरी यांचा हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश डुके यांनी केले. तर आभार रेखा घिया-दंडिगे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘मन कि बात’ रे‍डिओ कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामूहिक श्रवण

Mon Jun 19 , 2023
नागपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन कि बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा सामूहिक श्रवण सोहळा कोराडी येथील नैवद्यम नॉर्थस्टार हॉटेल मधील सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सकाळी 11 वाजता पार पाडला. शेकडो नागरिकांनी अतिशय शांततेने प्रधानमंत्र्यांचा संदेश सामूहिकरित्या ऐकला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाच्या महाराजबाग परिसरातील प्रशासकीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याच्या भूमिपूजनाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com