नागपूर :- स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांचे चिरंजीव स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची 367 वी जयंती आहे.
कही हम भूल न जाये या बसपाच्या राष्ट्रीय अभियानांतर्गत 14 मे रोजी सकाळी 10 वाजता बसपाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांचे हस्ते व आपल्या उपस्थितीत मानेवाडा रोडवरील छत्रपती संभाजी चौकातील (मानेवाडा रिंगरोड चौक) छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
बसपाचे प्रदेश, जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर व बूथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.