संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– पेंच व कन्हान नदी पाण्याची पातळी वाढली, नदी काठावरील नागरिकांना सर्तकतेचा ईशारा.
– एन.एस सावरकर आणि अजय शेलार यांचे नागरिकांना आवागन
कन्हान :- मध्यप्रदेशातील येथील चौराई धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्याचे ४ दरवाजे उघडुन पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तोतलाडोह आणि पेंच धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने दोन्ही धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने कन्हान नदीच्या पाण्याची पातळीत वाढ होत आहे.
मागील काही दिवसा पासुन मध्यप्रदेशात, नाग पुर जिल्ह्यात आणि रामटेक, पारशिवनी तालुक्या सह विविध ठिकाणी पाऊस चांगलाच पडत आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे मध्य येथील चौराई धरणाचे ४ दरवाजे दोन दिवसा पुर्वी उघडण्यात आले. त्यामुळे तोतलाडोह धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने तसेच धरणात येणारा पाण्याचा येवा नुसार धरण सुस्थीतीत, नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे काल धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे पेंच नवेगांव खैरी जलाशय पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाचे १६ दरवाजे ०.५० मिटर ने उघडुन पाण्याचा विसर्ग पेंच आणि कन्हान नदी पात्रात सोडण्यात आल्याने पेंच व कन्हान नदी च्या पाण्याची पातळी वाढली असुन नदी तुडुंब भरुन वाहत आहे.
आज सकाळ पासुन तोतलाडोह आणि पेंच धरणाचे सर्व दरवाजे सुरु असल्याने कन्हान नदी च्या पाण्याचा पातळीत आणखी वाढ होण्याची शक्य ता वाढली असल्याने कोणीही नदीवर जाऊ नये आणि नदी काठावरील नागरिकांनी सर्तक राहावे असे कडक डीचे आवाहन पेंच पाटबंधारे उपविभाग उपविभागीय अभियंता एन एस सावरकर आणि अजय शेलार यांनी नागरिकांना केले आहे.