– संदीप कांबळे,कामठी
-69 मिळकत धारकांना सनद वितरण
कामठी ता प्र 4:- सनद ही जनता व शासन यांच्यातील एक महत्वाचा दुवा असल्याने प्रत्येक मिळकत धारकाकडे सनद असणे आवश्यक आहे असे मौलिक मत कामठी चे तहसिलदार अक्षय पोयाम यांनी रणाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात भूमी अभिलेख विभागाच्या वतीने आयोजित सनद वितरण सोहळ्यात व्यक्त केले.
भूमी अभिलेख विभागाच्या वतीने महास्वामीत्व ड्रोनद्वारे गावठाण भूमापन योजना अंतर्गत रणाळा येथे आयोजित सनद व आखीव पत्रिका वितरण सोहळ्यात गावातील 69 मिळकत धारक ग्रामस्थांना सनद आखीवपत्रिका वितरण करण्यात आले याप्रसंगी प्रत्येक मिळकत धारकाकडे सनद असणे आवश्यक असल्याने सनद चे महत्व पटवून प्रत्येकापर्यंत सनद पोहोचविली जात असल्याचे मत भूमी अभिलेख उपसंचालक विष्णू शिंदे यांनी व्यक्त केले.याप्रसंगी बीडीओ अंशुजा गराटे, भूमी अभिलेख कामठी चे उपअधीक्षक श्याम पेनदे, आरोग्य विस्तार अधिकारो मनीष दिघाडे, भूमी अभिलेख विभागाचे देशपांडे, रणाळा ग्रा प सरपंच सुवर्णा साबळे, उपसरपंच खुल्लरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या सनद वितरण सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूमी अभिलेख विभाग कामठी चे उपअधीक्षक श्याम पेनदे,देशपांडे तसेच कार्यालयिन अधिकारी व कर्मचाऱ्यांनो मोलाची कर्तव्यदक्ष भूमिका साकारली