कोदामेंढी :- मागील अडीच वर्षां पासून महाराष्ट्रात महायुतीचे सरकार तर देशात मोदी सरकार असे डबल इंजिनचे सरकार असल्याने मागील अडीच वर्षापासून महाराष्ट्रात विकासाची गंगा चांद्यापासून बांद्यापर्यंत वाहत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने पुन्हा मोदी सरकारला तिसऱ्यांदा सत्तेत बसवले असून, चांद्यापासून बांद्यापर्यंत, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत विकासाची गंगा अशीच वाहत ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेतही महायुती सरकारला बहुमताने निवडून देण्यासाठी तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व कामठी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की,महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेसाठी महायुती सरकारने मागील अडीच वर्षात अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत .काँग्रेसला जनतेचे कल्याण पहावत नसल्याने अशा योजना बंद पाडण्याची तयारी केली आहे .काँग्रेसचे लोक कोर्टात गेले आहेत. कामठी- मौदा विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या निवडणूक प्रचारात बुधवार ६ नोव्हेंबर रोजी मौंदा तालुक्यातील कोदामेंढी ,रेवराल धानला,चिरव्हा, मौदा, बाबदेव, आणि माथनी गावांना भेटी दिल्या या भेटीदरम्यान त्यांनी दिवाळी मिलन कार्यकर्ता भेट व भाजपा पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना मिळणाऱ्या १५०० रुपयांमध्ये वाढ करून २१०० करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यासोबत शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे बिल माफ करून त्यांना मोफत वीज देणार, नुकसान भरपाई सर्वसामान्यांच्या विज बिलाची रक्कम३० टक्के कमी करणार, अपंग निराधारांच्या अनुदानात वाढ करण्यासह जनतेच्या हिताचे अनेक निर्णय भाजपा महायुतीने घेतले आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे ,राधा अग्रवाल ,निशा सावरकर,शकुंतला हटवार, माजी उपसभापती अशोक हटवार, चांगु तिजारे, प्रशांत भुरे, माजी सरपंच कैलास वैद्य,भगवान बावनकुळे, सरपंच विशाल सेलोकर ,अमोल नरुले, रेवानंद देशमुख ,अनिल पडोळे, सरपंचा माधुरी कैलास वैद्य, मंगला विष्णू देशमुख ,विनोद कारेमोरे, विनोद गभणे, नेकसिंग केरवार, टिळक दंडारे उपसरपंच गोपाल गिरमेकर,रामु धांडे ,भाजयूमो तालुकाध्यक्ष वैभव हटवारसह मौदा तालुक्यातील सर्व भाजपा व भाजयूमो पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ता गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.