चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घुस येथे ए.सी.सी.सिमेंट कंपनीने जादा उत्खनन केलेले नाही – उद्योग मंत्री सुभाष देसाई

  मुंबई  : ए.सी.सी. सिमेंट कंपनीने स्वामीत्वधन न भरता कोणतेही जादा उत्खनन केलेले नसल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत सांगितले.

            चंद्रपूर जिल्हयातील घुग्घुस येथे ए.सी.सी.सिमेंट कंपनीने जादा उत्खनन केल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य प्रतिभा धानोरकर, सुरेश वरपुडकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

            श्री. देसाई म्हणाले की, खनिकर्म संचालकांमार्फत दर तीन महिन्यांनी खाणींची पाहणी केली जाते. 1969 पासून ए.सी.सी. कंपनी सिमेंट उत्पादन क्षेत्रात काम करीत असून या कंपनीने जादा उत्खनन केल्याचे आढळून आलेले नाही. प्रमुख खनिजांचे वहन नियंत्रित करण्याकरिता आयएलएमएस (ILMS) या संगणकीकृत प्रणालीचा वापर होतो. वाहतूक करणारे नोंदणीकृत वाहन वजनकाटयावर उभे राहताच या प्रणालीमार्फत खनिजाच्या वजनानुसार ऑनलाईन वाहतूक परवाना प्रत्येकवेळी दिला जातो. त्याचवेळी वजनानुसार प्रणालीमधून स्वामीत्वधनाची कपात केली जाते. मंजूर आराखडयानुसार 2020-21 मध्ये 6.02 लाख टन इतके उत्खननास मंजूरी असून प्रत्यक्षात खाणपट्टेधारकाने 4.41 लाख टनाचे उत्खनन केले आहे. यातूच स्वामीत्वधनाची 3.53 कोटी रुपये रक्कम जमा केलेली आहे. त्यामुळे मंजूर उत्खननापेक्षा कमी उत्खनन झालेले असल्याने जादा उत्खनन झाल्याची बाब खरी नाही. तरीही कंपनीबाबत काही आक्षेप असल्यास याबाबत दखल घेतली जाईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात येणार - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

Sat Dec 25 , 2021
    मुंबई : शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सांगितले.             राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासंदर्भातील तारांकित प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कुणाल पाटील, समीर कुमावत यांनी उपस्थित केला होता.             श्री. वडेट्टीवार म्हणाले की, स्मार्ट योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. शेतकऱ्यांना देण्यात येणारे गट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com