चंद्रपूर शहर महानगरपालिकेत संविधान प्रस्तावनेचे वाचन

चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.

यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.

यावेळी मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी संविधान प्रस्तावना वाचन केले. यावेळी स्थायी समिती सभापती संदीप आवारी, महिला व बालकल्याण सभापती पुष्पाताई उराडे, माजी महापौर अंजली घोटेकर, यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मनपामध्ये संविधान दिवस संपन्न संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन

Sat Nov 27 , 2021
नागपूर: आपल्या भारतासारख्या विशाल देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध धर्माचे असंख्य लोक राहतात. मात्र देशाबाहेर सर्वांची ओळख ही एक भारतीय म्हणूनच पुढे येते ही अभिमानास्पद बाब आहे. भारतीय लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही आहे, भारतीय संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानामुळे देशाची एकता एकात्मता व अखंडता टिकून आहे, त्यामूळे संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, भारतीय संविधानामुळेच देशात समानता नांदत असल्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com