काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरेंना संधी

मुंबई :- काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सोनिया गांधींना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोनिया गांधी यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

देशभर लोकसभा निवडणुकांचा माहौल असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी असणार आहे. तर आज काँग्रेसने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून डॉ.अखिलेश सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंगवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

चंद्रकांत हंडोरे यांची कारकिर्द

१९८५ मध्ये मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येऊन, चंद्रकांत हंडोरे यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पुढे १९९२-९३मध्ये आपले खास राजकीय कौशल्य वापरून मुंबईचे महापौरपदही मिळविले. पुढे कालांतराने ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. २००४ मध्ये ते चेंबूर मतदारसंघातून निवडून आले आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. मंत्रिमंडळातही आक्रमक मंत्री म्हणून त्यांची चर्चा असायची. २००९ मध्ये ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले, परंतु त्यांना अंतर्गत स्पर्धेत मंत्रिपद मिळू शकले नाही. काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी भीमशक्ती नावाचा आपला दबाव गट कायम तयार ठेवला. सामाजिक अभिसरणाच्या प्रयोगातील मोहरा किंवा चेहरा म्हणून काँग्रेसला हंडोरे यांना संसेदत नेण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, २ गुन्हे उघडकीस

Wed Feb 14 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे पारडी हद्दीत प्लॉट नं. ६६७/ए, सुभाष मैदान जवळ, पारडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी निरज रामराव साळवे वथ ३० वर्षे, यांनी त्यांची मोटरसायकल क. एम.एच ४९ ए.डब्लू ५९९४ किमती ५०,०००/- रूची लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे समांतर तपासादरम्यान गुन्हेशाखा, युनिट क. ५ चे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!