अरोली :- पं.स.मौदा ,केंद्र अंजनगाव अंतर्गत येत असलेल्या भेंडाळा येथील उच्च प्राथमिक शाळेत केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव 17 डिसेंबर मंगळवारला सकाळी नऊ ते सायंकाळपर्यंत उत्साहात व थाटात पार पडले.
आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून सभापती स्वप्नील श्रावणकर अध्यक्ष म्हणून गट ग्रामपंचायत भेंडाळा सरपंचा शिल्पा राजकुमार भोयर, विशेष अतिथी म्हणून जि. प. सदस्य कैलास बरबटे, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर चौरे ,गटविकास अधिकारी विजय झिंगरे ,गट शिक्षणाधिकारी किरण चीन कुरे, प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भेंडाळा महादेव बांगडकर ,उपसरपंच सुषमा धांडे, ग्रामपंचायत सदस्य गण गौरीशंकर कारेमोरे, भामिता शेंडे ,आकाश शंभरकर, अमोल उईके ,वैशाली वाघाडे,पोमू मानापुरे, सुनिता नगरारे ,यशोदा भोयर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नामदेव वाघाडे, गट ग्रामपंचायत मांगली (तेली) माजी सरपंच रवी फटिंग ,मौदा तालुका पोलीस मित्र अध्यक्ष नामदेव ठोंबरे व मांगली तेली, भेंडाळा, नवेगाव, कोराड, धामणगाव, अंजनगाव, ईसापुर येथील सर्व शाळेतील व्यवस्थापन समिती अध्यक्ष सह केंद्र अंजनगाव अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक वर्ग, प्रतिष्ठित नागरिक महोत्सव पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
आयोजनाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख डॉक्टर शिल्पा सूर्यवंशी सह या केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मागील आठ ते दहा दिवसापूर्वीपासूनच सर्व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी सरावात व्यस्त दिसत होते हे विशेष.