– लक्ष्मीनगर चौकात ढोल ताशा, आतिशबाजी, मिठाई वाटून आनंद साजरा
नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानावर नागपूरचे सुपूत्र आणि महाराष्ट्राची शान देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच नागपुरात जल्लोष करण्यात आला.
शहरातील लक्ष्मीनगर चौकामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथग्रहण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी माजी महापौर संदीप जोशी उपस्थित होते. जनतेच्या लाडक्या ‘देवाभाऊंनी’ मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच लक्ष्मीनगर चौकामध्ये फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात मिठाई वाटून या गौरवशाली क्षणाचा आनंद साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मोठ्या संख्येत लाडक्या बहिणी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जयंत आदमने, नीरज दोंतुलवार, राजीव रोडी, निरंजन गाडगीळ, वंदना शर्मा, मनोज फणसे, हेमा आदमने, संध्या अढाळे, कीर्ती पुराणिक, उदय देशकर, राजाभाऊ ठकनाईक, राहुल खुराना, स्वप्नील वऱ्हाडपांडे यांच्यासह कार्यकर्ते आणि जनतेची उपस्थिती होती.