नागपूर :– पद्मगंधा प्रतिष्ठान सातत्याने गेल्या तीस वर्षांपासून सातत्याने कार्यरत असणारी साहित्यिक – सांस्कृतिक संस्था ! पद्मगंधाचं हे ५ वं राज्यस्तरीय साहित्य संमेलन.!
लोकाश्रित, लोकप्रतिष्ठीत, आणि लोकप्रिय असणा-या पद्मगंधाच्या पाचव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे. आणि उद् घाटक आहेत वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते व अखिल भारतीय हिंदी संस्थासंघाचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील आहेत.
ह्या संमेलनाचं वैशिष्ट्य असं की , मराठी भाषा महाराष्ट्रातून जाईल का ? मराठी भाषेचं भवितव्य काय ? याचा घेतलेला शोध आणि संशोधन म्हणजे *गर्जते ही मराठी* ही स्मरणिका भारतातल्या किती राज्यात आणि किती परदेशात मराठी भाषा प्रवाहित झाली आहे आणि महाराष्ट्रात ती किती अंगाने प्रवाहित आणि समृद्ध यावर असलेला परिसंवाद *अथांग ही मराठी , वाहते ही मराठी* हा आहे .
पद्मगंधाने पहिलं अखिल भारतीय साहित्य संमेलन सावनेरला महाकवी सुधाकर गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली घेतलं तेव्हा महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते .
त्यानंतर कुमारांनी कुमारांसाठी घेतलेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची अध्यक्ष बारावीची विद्यार्थी होता. सर्व पदं ही कुमारांनी भूषवली होती.नंतरच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे होते सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. किशोर सानप आणि उद् घाटक होत्या महापौर डॉ. नंदा जिचकार त्यानंतरचं साहित्य संमेलनाचे उद् घाटक होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अध्यक्ष होते डॉ. वि. स. जोग ह्यावर्षीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे .विशेष अतिथी अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे आणि त्यांच्यासह आहेत . पर्सिस्टंट कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. आनंद देशपांडे, ज्येष्ठ लेखिका आशा बगे , डॉ. भारती सुदामे, डॉ. गिरीश गांधी , डॉ. पंकज चांदे आणि शंकरराव जाधव. आणि उद् घाटक आहेत.
अशा ह्या संमेलनाला बहुसंख्येने उपस्थित असावं ही विनंती पद्मगंधाच्या कार्यकारिणी ने केली आहे.