छात्रवीर संभाजी महाराजांची जयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- मराठा सेवा संघ कन्हान व्दारे छात्रवीर, छत्रपती राजे संभाजी महाराजांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.

मंगळवार (दि. १४) मे २०२४ ला तारसा रोड कन्हान येथील मराठा सेवा संघ कार्यालयात छात्रवीर, छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस मराठा सेवा संघ कन्हान अध्यक्ष शिवश्री ताराचंद निंबाळकर, समन्वयक शिवश्री शांताराम जळते, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, संभाजी ब्रिगेड कन्हान अध्यक्ष राकेश घोडमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण आणि मान वदंना करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मान्यवरानी छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या जिवनावर उपस्थिताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मोतीराम रहाटे, राजेंद्र मसार, विठ्ठल मानकर, स्वप्निल मते, महेश काकडे, अमोल देऊळकर, राजुजी रेंघे, अमोल डेंगे, सुमित खैरकार, राजेंद्र ठाकरे सह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये जाणार,धर्माच्या नावाने अर्थसंकल्पाची फाळणी करण्याचा काँग्रेसचा डाव ! - नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौप्यस्फोट

Wed May 15 , 2024
नाशिक :- या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव होणार असून मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचे स्थान देखील त्यांना मिळणार नाही. कदाचित त्याची जाणीव झाल्यामुळेच आता महाराष्ट्रातील एका नेत्याने आपली दुकाने बंद करून काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला विरोधी पक्षांना दिला असून महाराष्ट्रातील नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक ) येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com