इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी १६ जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : जुलै- ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (इयत्ता दहावी) पुरवणी परीक्षेसाठीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यास १६ जून २०२३ पर्यंत मुदत आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

दहावीच्या परीक्षेचा निकाल या महिन्यात जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट २०२३ मध्ये होईल. या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय विषय घेवून प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे, Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रवीष्ट होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने दहावीसाठी www.mahasscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत. नियमित शुल्कासह १६ जून २०२३ पर्यंत, तर विलंब शुल्कासह २१ जून २०२३ पर्यंत अर्ज सादर करता येईल. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

NewsToday24x7

Next Post

सिंचन प्रकल्पातून पाणी सोडतांना जिल्हा प्रशासनासोबत समन्वय ठेवा - विजयालक्ष्मी बिदरी

Wed Jun 7 , 2023
– आंतरराज्य प्रकल्प समन्वय समिती नागपूर :-  पावसाळ्यात निर्माण होणारी पुरपरिस्थीती हाताळण्यासाठी तसेच सिंचन प्रकल्पातून अतिरिक्त पाणी सोडतांना तेलंगाना, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील महसूल व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांचे नियुक्ती करावी अशा सूचना विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केल्या.         नागपूर विभागातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा विभागीय आयुक्त्‍ श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com