संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
पाणी व प्राणवायुकरिता वृक्षरोपन व वृक्ष संवर्धन काळाची आवश्यकता.
कन्हान : – वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, सामा जिक वनीकरण पारशिव नी अंतर्गत नवेगाव खैरी रोपवाटिकेत आकाशझेप फाऊंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान अंतर्गत पेंच निसर्गमित्र मंडळ, सामााजि क वनीकरण विभाग व वनपरिक्षेत्र कार्यालय पारशिवनी, राष्ट्रीय आदर्श विद्यालयाच्या राष्ट्रीय हरीत सेना यांचे संयुक्त विद्यमाने तसेच महिला बचत गटांच्या सहकार्याने ५ जुनला विविध उपक्रम राबवुन पाणी व प्राणवायु करिता वृक्षरोपन, वृक्ष संवर्धन आज काळाची आवश्यकता आहे.असा संदेश देत जागतिक पर्यावरण दिवस थाटात साजरा करण्यात आला.
सकाळच्या सत्रात कार्यक्रमाध्यक्ष, आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक, शिक्षक साक्षोधन कडबे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व वृक्षपुजन करून नवेगाव खैरी परिसरात वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी वनपाल विजय येरपुडे, पोलीस पाटील रक्षणा गजभिये, वंदना भुर्रे यांनी पेंच परिसरातील जैव विविधता विषयावर ग्रामस्थांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साध ला. दुपारच्या दुसऱ्या सत्रात बीज संकलन स्पर्धा, निसर्ग सुविचार स्पर्धा, निसर्गचित्र स्पर्धा घेऊन देशी झाडांच्या बियांपासुन सीडबॉल निर्मिती उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन नीलिमा डकरे वनपरिक्षेत्र अधिकारी.सा.व.पारशिवनी, राजेश राठोड बार्टी रामटेक तालुका समतादुत, जया राठोड शिक्षिका, मोतीराम रहाटे पत्रकार, शांताराम जळते सेनिशि, हिव राज वाढई, वनपाल पारशिवनी, एन.एम.नगराळे वनपाल चारगाव, एस.के. पठाण, यु.एस.बावणे, श्री.वाहने वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय प्रादेशिक पारशिवनी, आकाशझेप संचालक वैभवराव तुरक, संचालक शैलेश वाढई आदीने वृक्षरोपन, वृक्ष संवर्धन आज काळाची नितांत आवश्यकता असल्या चा संदेश देत मार्गदर्शन केले. याप्रसंगी आकाशझेप फाऊंडेशन रामटेक द्वारे बीज संकलन स्पर्धा प्रथम विजेता अंजली दिवटे, चित्र कला स्पर्धा प्रथम विजेता सेजल राऊत, निसर्ग सुवि चार स्पर्धा प्रथम विजेता नीरज राऊत यां ना पाहुण्यां च्या हस्ते पारितोषिक तसेच सहभागितांना ‘निसर्गमित्र ‘ प्रशस्ति पत्र, पुष्पगुच्छ, भेटवस्तु व खाऊ वितरण करून गौरविण्यात आले. यावेळी प्रामुख्याने बचत गटांच्या महिला कार्यकर्त्या नानु राऊत, उर्मिला राऊत, जना राऊत, लक्ष्मी पारधी, आशा साहारे, करिश्मा राऊत, सविता ढोंगे, गंगु सोनवा णे, हरित सेनेचे कुश ढोरे, ओम दरवई, अतीत कोडवते, प्रज्वल ठाकुर, लव ढोरे, कार्तिक राऊत, रोहित चक्रवर्ती, प्रज्वल सहारे, प्रीतम ढोरे, दर्शन बेंद्रे, श्लोक बगमोरे, अनिकेत पुरकाम, रोहित मुंगभाते, विवेक बेंद्रे, प्रज्वल कुथे, रजत दरवई, रुचिका राऊत, दीपाली वारकर, अश्विनी सोनेकर, तनुश्री राऊत, सेजल ढोरे, प्राची राऊत, अमृता डोनारकर, नंदिनी ढोरे, हर्षदा ठाकुर, माही डायरे, तनुश्री राऊत, समीक्षा रेवडे, नंदनी ढोंगे, रिया गजभिये, निशा बेदरे, ईशानी बगमारे, पायल कुथे, आराद्या भुर्रे, वंशिका सावरकर, भुमिका शेंडे, दीपक धुर्वे, अजय बेलवंशी, आकाशझेप सदस्य प्रफुल्ल राऊत, अविनाश मैंद, अनिकेत मैंद, अजय राऊत, अभिषेक मैंद, आकाश राऊत, आकाश कोठाळे हयांचा उत्साहपुर्ण सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन वनपाल सामाजिक वनी करण पारशिवनीचे विजय येरपुडे यांनी केले तर आकाशझेप चे प्रफुल्ल राऊत यांनी हरीतसेनेचे निसर्गदुत व बहुसंख्येने उपस्थितांचे मनस्वी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोपवाटिकेचे पर्यवेक्षक मनोहर शेंडे, दिनेश ठाकरे, वनमजुर सुरेश भोयर, गजानन ढोंगे यांनी परिश्रम घेतले.