हिंगणा :- रेणुका सभागृह हिंगणा पंचवटी समोर “समर कार्निवल उडाण चॅप्टर -२” हा साजरा करण्यात आला. याकरीता दोन संस्थानी ब्रॉडवे डान्स अकादमी व अनमोल फौंडेशन एकत्रित येऊन कामे केली. दोन्ही संस्था गेल्या बऱ्याच वार्षा पासून स्वतःहून आपले कामगिरी पार पडत आहेत. यावर्षी कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्या मुळे ब्रॉडवे डान्स अकादमीचे संचालक विशाल चाहांदे व अनमोल फौंडेशनचे संचालक अनमोल डी.गणेर एकत्र आले.”उडाण चॅष्टर -२ हा समर मध्ये घेतलेल्या ऐक्टिव्हिटी मधून विद्यार्थ्यांचा टॅलेंट लास्टेज मिळवला म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नृत्य, गायन, तबला, एकपात्री नाटक, हार्मोनियम अशे विविध प्रकारचे विद्यार्थ्यांचा कलागुणांना पुढे आणून व्यासपीठावर पुढे प्रदर्शित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटक सतीश मोहोड, मोहोड अससोसिएट्सचे प्रोप्राएटर व ऑरेंज सिटी प्रोडूकशनचे प्रोड्युसर यांच्या हस्ते करण्यात आले. व सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून नारी शक्ती उद्योगिनी केंद्राच्या संचालीका दीपाली पाटील, स्टॉक नीतीचे डायरेक्टर आशिष तिरपुडे, मराठी चित्रपट निर्माता गणेश पाटील, विनायक इंगळे, गजानन ढाकुलकर, पियुष पोकळे यांची सुध्दा प्रामुख्याने उपस्थिती होती. सोबतच कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला म्हणून ऑरेंज सिटी प्रोडक्शनची टीम दहिवली फॅमे साहिल कडक -सोसिअल मीडिया कन्टेन्ट क्रेटर सोबतच अभिनेत्री रोशनी सेलोकर, प्रोड्युसर सतीश मोहोड, डायरेक्टर शुभम सुर्यवंशी, कोरिओग्राफर रितिक लोखंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्व प्रमुख पाहुन्याचे मोमेंटो देऊन स्वागत करण्यात आले. “समर कार्निवल २०२४ उडाण चॅप्टर -२ या कार्यक्रमाला लेवल वर घेऊन आणण्याकरिता हिंगणा क्षेत्राचे शशिकांत थोटे स्वराज्य सेनेचे संस्थापाक अध्यक्ष, रेणुका सभागृहचे संचालक अरुण भेंडे. संयम ज्वेलर्सचे संचालक शिवप्रसाद पटले, नारी शक्ती उद्योगिनी केंद्राच्याच्या संचालिका दिपाली पाटील, स्टॉक नीतीचे डायरेक्टर आशिष तिरपुडे यांनी पुढे येऊन देणगी स्वरूपात मदत केली.
या कार्यक्रमात एकूण १२५ विद्यर्थियानी सहभाग घेतला आणि त्यामधून त्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून दोनही संस्थेतर्फे ट्रॉफी व सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले, कार्यक्रमाला होस्ट म्हणून अँकर परेश यांनी प्रेक्षकांना भरभरून हसवून त्यांचे मनोरंजन केले. ह्या कार्यक्रमाचा पूर्ण श्रेय अनमोल फौंडेशनचे संचालक अनमोल गणेर व ब्रॉडवे डान्स अकादमीचे संचालक विशाल चांहांदे यांना दिल्या जाते.