कामठीत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-मुश्ताक अहमद कप्तान फुटबॉल अकादमी मंच व ओगावा सोसायटी च्या संयुक्त विद्यमाने अनेक फुटबॉल खेळाडूंचा सत्कार

कामठी ता प्र 29 :- मुश्ताक अहमद कप्तान फुटबॉल अकादमी व ओगावा सोसायटी कामठी च्या संयुक्त विद्यमाने ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या ऑडिटोरियम सभागृहात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी रब्बानी स्कुल अंडर 17 वर्ग सुब्रतो मुखर्जी फुटबॉल ट्रॅफि नागपूर विभाग चेम्पियन झाल्याबद्दल व अन्सार स्पोर्टिंग क्लब कामठी नागपूर जिल्हा फुटबॉल संघची एलिट डिव्हिजन लीग फुटबॉल चॅम्पियन झाल्याबद्दल खेळाडूंचा आकर्षित ट्रॉफी व स्मरणिका प्रदान करून सम्माणीत करण्यात आले.याप्रसंगी कामठी चे मान्यवर क्रीडा प्रेमी व खेळाडू प्रामुख्याने उपस्थित होते.

   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे होते तर प्राचार्य डॉ अशोक कापटा,पूर्व प्राचार्य डॉ नसीम अखतर, डॉ कमाल अहमद, जनआक्रोश चे सचिव रवींद्र कासखेडीकर,ज्ञानेश्वर पाहुणे,मकसूद मुश्ताक कप्तान,खतीजाबाई स्कुल च्या पूर्व मुख्याध्यापिका शबनम वाजीदा प्रामुख्याने उपस्थित होते.

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ अशोक कापटा यांनी देशाप्रति हॉकी खेळात मेजर ध्यानचंद यांनी केलेले योगदानाबद्दल विस्तृत मार्गदर्शन करून जीवनकार्यावर प्रकाश टाकला.तर माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा  कुंभारे यांनी अध्यक्षीय भाषणात उपास्थितांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देत खेळाडूंना योग्य त्या सोई सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित केले.दरम्यान डॉ नसीम अखतर ,डॉ कमाल अहमद,रवींद्र कासखेडीकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन अकादमी चे सचिव डॉ कमाल अखतर सलाम यांनी केले.तर आभार प्रदर्शन आसिफ अखतर पटेल यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रियाज अहमद, शारीक,शहनवाज अन्सारी,अजमत कमाल,अखतर जमाल,गणेश शेंगर,सुकेशनी मुरारकर,निशा फ़ुले, विशाखा पाटील,राजेश शंभरकर,सुनील वानखेडे आदींनी मोलाची भूमिका साकारली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला नवीन कामठी पोलिसांनी केला रूट मार्च..

Mon Aug 29 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 29 :- आगामी गणेशोत्सवा दरम्यान शहरात कायदा सुव्यवस्था राहावी याकरिता नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रूट मार्च करून नागरिकांना कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन केले . या रूट मार्च ची सुरुवात नवीन कामठी ठाण्याचे ठाणेदार संतोष वैरागडे यांचे उपस्थितीत करण्यात आले यावेळी दुय्यम निरीक्षक कमलाकर गड्डीमे पोलीस उपनिरीक्षक शाम वारंगे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!