महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा

– निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

नवी दिल्ली :- भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रधान सचिव तथा निवासी आयुक्त रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि काॅपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह राष्ट्रगीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलन झाले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र सदनाच्या यहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार आणि सि्मता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र सदनात निवासास असणारे अतिथी तसेच दिल्ली स्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor greets people on Parsi New Year

Fri Aug 16 , 2024
Mumbai :-Governor C P Radhakrishnan has greeted the people of Maharashtra on the occasion of Parsi New Year. In his message, the Governor has said: “Navroz which marks the first day of the Parsi New Year, reminds us of the immortal message of Good thoughts, good words and good deeds. I extend my heartiest greetings to the people of the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com