सावधान !कामठी तालुक्यात डेंग्यूचा धोका घोंगावतोय..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

-कामठी तालुक्यात डेंग्यूचा उपद्रव

कामठी ता प्र 18:-कामठी तालुक्याच्या शहरासह ग्रामीण भागामध्ये सध्या डासांचे साम्राज्य वाढल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत .यासह डेंग्यूसदृश्य तापाची लागण ही जोरात आहे.कामठी नगर परिषदच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य चमूने केलेल्या सर्वेक्षणात दररोज डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत यावर खबरदारी घेण्याचे उपाय सांगण्यात येत असून आरोग्य विभागातर्फे घरोघरी भेट देण्यात येत आहे.उल्लेखनीय आहे की मागील दोन वर्षांपूर्वी यादवनगर तसेच यशोधरानगर येथील दोन इसमाचा डेंग्यूसदृश्य आजराने तडकाफडकी मृत्यू झाला होता तर डेंग्यू,मलेरिया यासारख्या आजारांना आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाने धूर तसेच औषध फवारणी करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

मागील महिन्यापर्यंत झालेल्या पावसामुळे तसेच परतीच्या पावसामुळे नाले गटारी तसेच मोकळ्या जागेत पाणी साचलेले आहेत तसेच परिसरात झाडे झुडपे वाढल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात डास झाले आहेत या डासांमुळे परिसरातील नागरिकांना डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांची लागण झाली आहे अशातच लहान मुलांसह वृद्धांना ही ताप येत असल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे.डांसापासून परिसरातील सर्वत्र ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून स्थानिक प्रशासनाकडून धूर फवारणी करणे आवश्यक आहे .

स्वच्छता ठेवून नागरिकांनी सतर्कता बाळगावी:-डॉ शबनम खाणुनी  

डासांपासून रोगांची लागण होऊ नये यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी घरातील पाण्याने भरलेले सर्व भांडी रिकामी करावी .पाण्याची भांडी झाकून ठेवणे, झाडांच्या कुंड्या, फुलदाण्या, फिश टॅंक, आदीतील पाणी नोयमित बदलावे, घराभोवतालचो परिसरातील जागा स्वच्छ कोरडी ठेवावी, घरातील दरवाजे खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवून घ्याव्यात व डास चावणार नाहोत याची काळजी घ्यावि जेणेकरून डासांपासून होणारे आजार रोखता येतील.असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांनी व्यक्त केले.आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आजारांचा प्रसार कसा होतो त्यावरील नियंत्रण, आजारांची लक्षणे, निदान व त्यावरील उपाय याबद्दल जनमानसांनी जागरूकता बाळगावी, हिवताप व डेंगू या आजाराची लक्षणे जवळजवळ सारखेच असतात ज्यात प्रामुख्याने थंडी वाजणे, अंग दुखणे, तिव्रताप येणे तसेच शरीरावर पुरळ येने ही लक्षणे मनुष्य शरीराच्या प्रतिकार शक्तीनुसार कमी अधिक प्रमाणात आढळून येतात ही लक्षणे आढळल्यास त्वरित रक्ताची तपासणी करून घ्यावी तसेच तग्ग्मर्फत रोगाचे अचूक निदान करून औषधोपचार करणे गरजेचे आहे .हिवतापाचा प्रसार हा एनाफिलीस तर डेंग्यूचा प्रसार हा एडिस डासांच्या मादीपासून होतो.हिवताप व डेंगू या आजाराचे डास स्वच्छ व स्थिर पाण्यात अंडी घालतात तर हत्तीरोग आजाराचा डास घाणेरड्या पाण्यात अंडी घालतात असतो.डासांच्या माद्या अंडी देण्याकरिता पोषक म्हणून मानवी रक्ताचे शोषण करतात व त्याद्वारेच मानवाला या तापाची लागण होते . त्यामुळे या आजाराचे नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी पावसाच्या साठलेल्या पाण्यामुळे होणारी डासांची उत्पत्ती थांबविणे अधिक प्रभावशाली ठरू शकेल.घरात डासांची निर्मिती थांबविण्यस्कारिता आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, ज्या दिवशी पाणी साठविण्याची मोठे मोठे , पाण्याच्या टाक्या धुवून स्वछ व कोरड्या कराव्यात .संडासच्या व्हॅट पाईपला जाळ्या बांधाव्यात ज्या पाणीसाठ्यावर आपण कुठलीही प्रक्रिया करू शकत नाही त्या पाण्यात डास अळी भक्षक गप्पी माशांचा वापर करावा .घराच्या भोवताल पाणी साचू देऊ नका, पाण्याच्या उघड्या टाक्या, फुटक्या कुंड्या, टायर यामध्ये पाणी साठू देऊ नये अर्थातच डासांची उत्पत्तीची सर्व माध्यमे नाहीशी करावीत , डास चावूच नये म्हणून प्रतिबंधक मलमांचा वापर करावा .झोपताना मचारदाणीचा वापर करावा तसेच डास व व्यक्ती यांचा संपर्क येणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी असे आव्हान डॉ शबनम खानुनि यांनी केले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

११ वी विज्ञान शाखेचे बहुसंख्य विद्यार्थी प्रवेशापासून वंचित!

Tue Oct 18 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- विद्यार्थी संख्येच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नये या शालेय शिक्षण विभागाच्या अध्यादेशामुळे बहुसंख्य विद्यार्थी विज्ञान शाखेच्या प्रवेशापासून वंचित असल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासन, प्रशासनाने परिसरातील अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अतिरिक्त वाढीव संख्या मंजूर करून तातडीने प्रवेशाचा प्रश्न सोडवावा,अशी मागणी पालक व विद्यार्थी करत आहे. शालेय सत्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!