– मानेवाडा रोडवरील जनावरांचा ठिय्या !
– जनावरांच्या मालकांविरुद्ध कारवाई करावी
– अपघात, प्राणहानी किंवा जीव गेला तर जबाबदार कोण ?
नागपूर :- दक्षिण नागपूर येथील तुकडोजी पुतला चौक ते मानेवाडा चौक यादरम्यान रोडवरील सकाळी सकाळी ८ वाजल्यापासून तर १० वाजेपर्यंत गाईंचा बसलेला कळप दिसतोय आणि भर रस्त्यात मध्या मध्ये गायीं चालतात त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांचा अपघात होऊ शकतो यावर एनएमसीने लक्ष वेधावे व ज्यांची जनावरे आहेत अशा पैकी मालकांना नोटीस बजावून कारवाई करण्यात यावी. आपले जनावर आपल्या घरीच बांधून ठेवावे कारण पाणी पावसाचे दिवस आहे. रोडवर वाहन चालकांच्या गाड्या स्लिप होतात आणि गाई मधातच बसतात त्यामुळे अपघात होतात.
शहरातील भरपूर ठिकाणी मोकाट जनावरे असे रस्त्यावर चालत दिसतात, अगदी रोडच्या मधोमध बसतात. ही झानेश्वर गेट समोरील आजची स्थिती आहे. याकडे प्रशासन लक्ष देत नाही. प्रशासन गाढ झोपलेले आहेत ! प्रशासनाने नगरसेवकांना देखील घरीच बसवले आहे. अशावेळी जर कोणाचा जीव गेला किंवा अपघात झाला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण होतो ? तरीही झोपेतून प्रशासन उठत नाही आणि लक्ष वेधत नाही.