नागपूर, दि. 23 :- विधानसभेच्या सदस्या मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने त्यांना विधानपरिषदेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेला शोक प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या शोकप्रस्तावात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, दिवंगत मुक्ता शैलेश टिळक यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६५ रोजी मध्यप्रदेश राज्यातील ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे शिक्षण एम. ए. (मानसशास्त्र), डी. बी. एम., डी. एम. एम. पर्यंत […]

नागपूर, दि. 23 : पुणे शहरासाठी समान पाणीपुरवठा योजना प्रकल्पांतर्गत कामे सप्टेंबर २०२३ पूर्वी आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करणे या प्रकल्पाची कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. ही कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य सुनील कांबळे यांनी यासंदर्भात आज लक्षवेधी सूचना […]

मुक्ता टिळक यांच्या निधनाने समाजाचे नुकसान- अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर नागपूर, दि. 23 : विधानसभा सदस्य मुक्ता टिळक यांच्या निधनाने केवळ एका पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान झाले आहे, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी शोक भावना व्यक्त केल्या. ॲड.नार्वेकर म्हणाले, दिवंगत टिळक यांनी आनंदवन मित्र मंडळाच्या अध्यक्षा, लोकमान्य टिळक विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षा म्हणून काम केले होते. […]

अमरावती :-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या पदवी/ पदव्युत्तर पदवी, समुपदेशन व मानसोपचार अभ्यासक्रमाव्दारा ‘एकविसाव्या शतकातील समुपदेशाची कौशल्ये’ या विषयावर उद्या शनिवार दि. 24 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता डॉ. के.जी. देशमुख सभागृह येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. समुपदेशन कौशल्ये ही परस्पर आणि तांत्रिक वैशिष्ट आहेत, जी समुपदेशक त्यांच्या सल्लार्थीला चांगल्या […]

सभागृहात न जाता सरकारच्या विरोधात घोषणाबाजी… नागपूर दि. २३ डिसेंबर :- शिंदे – फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून सभागृहात न […]

– काळ्या पट्टया बांधून आमदारांनी केला निषेध… नागपूर दि. २३ डिसेंबर :- बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे… बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… सरकार हमको दबाती कर्नाटक को घबराती है… कुंभकर्णाने घेतलं झोपचं सोंग तिकडे कर्नाटक सरकार मारतंय बोंब… कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध… लोकशाहीचा खून करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय…सीमा प्रश्नी […]

कबड्डी खेळाला ग्रामीण भागानेच जपले आहे आवळेघाट येथील कबड्डी स्पर्धेत प्रर्यटक मित्र चन्दपाल चौकसे यांचे उदगार पारशिवनी :-  पाराशिवनी तालुकातिल आवळेघाट येथे आदर्श क्रीडा मंडळ, व लाईफ फाऊडेशनच्या संयुक्त विद्यमाने आवळेघाट येथे तसेच एक दिवसीय कबड्डी स्पर्धा संपन्न. शहरात सर्व सुविधा असतानाही तेथील बहुतांश लोकांनी कबड्डी सोडून अन्य खेळाना जवळ केले . मात्र ग्रामीण भागातील लोकांनी खऱ्या अर्थाने आपला देशी […]

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकाद्वारे दिनांक 21 डिसेंबर पासून दिवसीय राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत महिला आरोग्य समिती मधील अध्यक्ष व समिती सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असुन तीन दिवसीय प्रशिक्षण बजाज पॉलीटेक्नीक मध्ये घेण्यात येणार आहे. यात तज्ञ मार्गदर्शकांद्वारे मार्गदर्शन केले जात असुन शासनाच्या विविध योजना […]

नागपूर : दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 1.30 ते 2 च्या दरम्यान कळमना कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर येथील मिर्ची गळ्यामध्ये अचानक आग लागल्यामुळे कास्तकार व व्यापारी यांचे करोडो रुपयाचे नुकसान झाले आहे. संजय वाधवानी, वसंत पटले यांच्या खळ्यात ही घटना घडली असून आगीमुळे कँन्टीनसुद्धा स्वाहा झाली. आज घटनास्थळी जाऊन समितीचे सचिव यगलेवाड यांच्यासोबत निरीक्षण केले. आशिया खंडातील सर्वात […]

नागपूर : सुयोग पत्रकार निवासस्थानी आज आयोजित गझल मैफलीला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित राहून कलावंतांना भरभरून दाद दिली. सुयोग येथे आज कृषी मंत्र्यांनी भेट देऊन विविध सुविधांची पाहणी केली व माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुयोग येथील सभागृहात आयोजित मैफलीला उपस्थित राहून गझलगायन सादर करणाऱ्या कलावंतांना भरभरून दाद दिली. शिबिरप्रमुख विवेक भावसार उपस्थित होते. नागपूर येथील स्वरराज […]

नागपूर  : नागपूर भेटीवर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गुरुवारी २२ डिसेंबर रोजी धंतोली येथील रामकृष्ण मठाला भेट दिली व सर्व भक्तांसह संध्या आरती केली. राज्यपालांनी भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन घेतले तसेच माताजी श्री सारदा देवी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना वंदन केले. त्यानंतर आश्रमातर्फे चालविण्यात येणाऱ्या विविध सेवाकार्यांबद्दल माहिती जाणून घेतली व विवेकानंद धर्मादाय मल्टी थेरपी […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवारी (22) रोजी शोध पथकाने 147 प्रकरणांची नोंद करून 70600 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

नागपूर : पुण्याच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, मुक्ताताई या भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. सुमारे 30 वर्ष त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी […]

नागपूर : राज्यात कोरोना कालावधित विधवा झालेल्या महिलांची उपजीविका आणि अनाथ बालकांसाठीच्या बालसंगोपन योजनेच्या सहायक अनुदानामध्ये २ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असून येत्या तीन महिन्यांत सदरहू रक्कम वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. राज्यात मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत अनुदानात वाढ तसेच पंडिता रमाबाई व्याजमाफी योजना अंमलात […]

नागपूर : जगातील चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा बीएफ 7 हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून मास्कचा वापर करीत गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे निवेदन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत केले. मंत्री डॉ. सावंत […]

कोविड परिस्थिती नियंत्रणात ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची पालकमंत्र्यांनी दक्षता घ्यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश नागपूर : जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून […]

गडचिरोली : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत गरोदरपणा पासुन ते बाळाच्या जन्मा पर्यंत तिन टप्प्यात ५०००/- रुपये मिळतात. या साठी १५० दिवसांचे आत शासकीय संस्थेत गरोदरपणाची नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र या योजने अंतर्गत मातांचा बँक खात्यावर अनुदाची रक्कम वर्ग करण्यासाठी असलेल्या सुविधेत काही महिन्यापासुन राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक अडचण निर्माण झालेली होती. ही अडचण दुर होताच आरोग्य प्रशासनाने एकुण २८८१ […]

नागपूर :-आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू ) नागपूर जिल्हा तर्फे पत्र परिषदेतून कॉ.राजेंद्र साठे, कॉ. प्रीती मेश्राम, कॉ. रंजना पौनीकर यांनी सूचित करण्यात केले आहे की, 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा वर्कर व गटप्रवर्तक काम करीत आहेत. देशातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची महत्वाची जिम्मेदारी आशा वर्कर यांच्यावर असतो. कोरोनाचे संकट काळामध्ये भारताला महामारी पासून मुक्त करण्याकरता […]

– राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, मनपा, नागपूर नागपूर : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरूवारी (ता.२२) पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाचा आढावा घेतला. गुरूवारी राजभवन येथे राज्यपाल महोदयांच्या अध्यक्षतेखाली नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्हा व शहर क्षयरोग अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक पार पडली. बैठकीत राज्यस्तरीय अधिकारी, संजय खंडारे, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई, डॉ. विनीता जैन, उपसंचालक, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ,१२, वी कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या आयशा नसीम, इशांक तेलंग, अभिमन्यू कुशवाह या तीन विद्यार्थ्याची निवड राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे.असे जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर यांनी काढलेल्या प्रसिध्दीला दिलेल्या पत्रातून कळविले आहे. आधी या तीनही विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रपूर द्वारा आयोजित विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत भाग […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com