-18 जानेवारीला मतदान -19 जानेवारीला मतमोजणी भंडारा :- राज्य निवडणूक आयोग यांचे दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 7 पंचायत समित्यांमधील अनारक्षित गटातील जागांसाठीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून तो पुढील प्रमाणे आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी पार पडले आहे. निवडणुकीच्या तारखांची सूचना व निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्द करण्याची तारीख बुधवार, 29 डिसेंबर 2021. […]
Marathi News
नागपुर – 2021 या वर्षात, कोरोना महामारी या संकटातून संपूर्ण भारताला या रोगापासून मुक्त व रक्षण करावे यासाठी 21 वेळा पारायणाचे आयोजन, 21 वेळा हरिपाठ, 21 वेळा महाआरतीचे आयोजन व महाप्रसाद असा संकल्प घेवून रिंग रोड मानेवाडा नागपूर येथील श्री संत गजानन महाराज परिवारा तर्फे पालखीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारी व ओमायक्राँन संसर्ग होऊ नये यासाठी 2021 वर्षात […]
चंद्रपूर : प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूचा वापर करून बनविण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व हाताळणी करण्यास मनपाने पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 अन्वये प्रतिबंध केले आहे. नायलॉन मांजाच्या जप्तीसाठी झोननिहाय ३ पथक गठीत करण्यात आले असून, यात मनापासोबत पोलीस विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या पथकाने आज दिनांक 28 डिसेंबर रोजी शहरातील विविध पतंग विक्रीच्या दुकानात भेटी देऊन तपासणी केली. नायलॉन […]
चंद्रपूर : शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. भिवापूर परिसरातील झोन ८ मधील योजनेचे काम पूर्ण झाले असून, लोकार्पण सोहळा मंगळवार, ता. २८ डिसेंबर रोजी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पार पडला. भिवापूर प्रभागातील नरेंद्र लाडेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या लोकार्पण सोहळ्याला स्थायी समिती सभापती संदीप आवारी, […]
मुंबई : खामगाव- जालना येथील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भातील तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य संजय गायकवाड, कैलास गोरंट्याल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, खामगाव- जालना चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणच्या रस्त्यांवरील कामासाठी हरकती घेण्यात आल्याने ही कामे प्रलंबित […]
मुंबई : सार्वजनिक वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांवरुन समृद्धी महामार्गाच्या बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले. अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्याअंतर्गत असेलेले रस्ते दुरुस्त करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे, सुरेश वरपुडकर, भास्कर जाधव, रवी राणा, हिरामण खोसकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. मंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. समृद्धी महामार्गाचे […]
चंद्रपूर: शहर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक एक, दोन आणि तीन अंतर्गत 29 शौचालये सार्वजनिक आहेत. यातील दहा सार्वजनिक शौचालये “पे अँड युज” तत्त्वावर चालवण्यासाठी मनपाच्या विचाराधीन होते. त्यातील दहा स्वच्छतागृहांमध्ये प्रति शौचविधीकरिता पाच रुपये शुल्क आकारणीला स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांच्या अध्यक्षतेखाली 28 डिसेंबर रोजी स्थायी समिती सभागृहात बैठक पार पडली. यावेळी सर्व समिती सदस्यांची उपस्थिती होती. […]
-३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. २८ डिसेंबर) रोजी प्लास्टिक पतंगच्या विरोधात कारवाई करीत ५०० प्लास्टिक पतंग जप्त केली. या कारवाईत १०,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनमधील ७ पतंग दुकानांची तपासणी करुन ५०० प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आले. शोध पथकाने १० झोन मध्ये ५७ दुकानांची तपासणी केली. याशिवाय उपद्रव शोध पथकाने ३ […]
-स्वच्छता, डागडुजी, देखरेखीकडे लक्ष देण्याचे दिले निर्देश नागपूर : अंबाझरी तलावालगत साकारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकस्थळी मंगळवारी (ता.२८) महापौर दयाशंकर तिवारी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण स्मारक परिसराची पाहणी करून परिसरातील स्वच्छता, स्मारकस्थळाची डागडुजी आणि संपूर्ण देखरेखीकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता अजय मानकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, नोडल अधिकारी स्वच्छता डॉ.गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर, स्मारक स्थळाच्या देखरेखीची जबाबदारी […]
चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत चंद्रपूर शहरातील नागरिकांसाठी स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात झिरो डम्प, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट, ट्रान्स्परन्सी (डिजिटल इनाब्लेमेन्ट ) आदी विषय यात आहेत. येत्या ३० डिसेंबर रोजीपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येईल. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर यावर राणी हिराई सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली […]
मुंबई : राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदाच्या रिक्त जागा भरण्याबाबत कृषि विभाग कार्यवाही करत आहे. सध्या आवश्यकता तपासून तासिका आणि मानधन तत्वावर पदे भरण्याच्या सूचना कृषि विद्यापीठांना केल्या असून पदोन्नतीचा विषयही लवकर मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. विधानपरिषदेत सदस्य सतिश चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे कृषि विद्यापीठातील रिक्त पदांचा प्रश्न मांडला होता. कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यातील […]
मुंबई: राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदभरती,नव्याने इमारतींचा विकास तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दर्जाची ३७० पदे भरली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे,अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी राज्यातील आरोग्य विभागाशी संबधित उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना श्री. टोपे […]
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील कौसा रूग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य ॲड निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिकेच्या कौसा रुग्णालयाची उभारणी तसेच उभारणीच्या कामाला लागलेला विलंबासंबधी लक्षवेधी मांडली. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, या कामाच्या मान्यतेसाठी ५४ कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. तसेच पावसाळा वगळून २४ महिन्यांची मुदत कंत्राटदाराला […]
मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षण भाग व तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा –भीमा स्थिरीकरण योजनेला गती मिळाली नाही तरी या योजनेसंदर्भात शासन करीत असलेली कार्यवाही याबाबत लक्षवेधी मांडली. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले,पावसाळ्यात कृष्णा खोऱ्यातून वाहून जाणारे […]
मुंबई : वृक्षतोडीच्या घटना जर कुठे घडत असतील तर अशा वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार असल्याची माहिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य अरूण लाड यांनी कडेगाव-पलूस वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड तसेच या परिसरात करण्यात येणारी लागवड याबाबत शासन करत असलेली कार्यवाहीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कडेगाव-पलूस वन परिक्षेत्राची निर्मिती सन २०१४ मध्ये झाली असून कडेगाव-पलुस […]
मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील जलसंधारण विभागात सन २०१७ ते २०२० मध्ये करण्यात आलेल्या स्टेशनरी खरेदीबाबत चौकशी करू, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य अंबादास दानवे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील जलसंधारण विभागात सन 2017 ते 2020 या कालावधीत बोगस बिलांवर स्टेशनरी खरेदी करून मोठ्या प्रमाणात घोटाळ झाला आहे. पुरवठादार कंपनीने दोन एजन्सीनी एकाच व्हॅट क्रमांकाची बिले सादर केली आहेत […]
मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी विनाअनुदानित प्राथमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य कपिल पाटील यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तरांच्या प्रश्नांबाबत शासन कोणती कार्यवाही करत आहे अशी लक्षवेधी सूचना मांडली. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले,मुंबई महापालिका क्षेत्रातील विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना […]
-शिक्षण विशेष समितीच्या बैठकीत ठराव पारित नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे मनपाच्या शाळेत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. जे दिव्यांग विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मनपातर्फे टॅब देण्यात येणार आहेत. असा ठराव मंगळवारी (ता.२८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात शिक्षण समिती सभापती प्रा. […]
-के आर मलकानी जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजभवन येथे कार्यक्रम संपन्न मुंबई : पाँडिचेरीचे माजी नायब राज्यपाल दिवंगत नेते के.आर. मलकानी हे विलक्षण प्रतिभा लाभलेले प्रखर राष्ट्रवादी पत्रकार होते. अनेक उत्तमोत्तम पत्रकार व स्तंभलेखकांना सोबत घेऊन ऑर्गनायझर हे वृत्तपत्र त्यांनी घरोघरी पोहोचविले व वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. दिवंगत मलकानी यांनी आपले संपूर्ण जीवन मातृभूमीसाठी समर्पित केले, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी […]
मुंबई : राज्यात कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. अकोला येथील महामार्गाजवळ क्रमांक सहावर एका खासगी कंत्राटदाराकडून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्या डांबरीकरणाच्या प्लाँटमध्ये 21 नोव्हेंबर रोजी स्फोट होऊन झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी लक्षवेधी सूचना सदस्य […]