यवतमाळ :- भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.श्रवनन एम. आणि शास्त्रज्ञ डॉ. राहुल फुके यांनी कृषी विज्ञान केंद्रास प्रक्षेत्र भेट देवून आढावा बैठक घेतली. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी जगदीश चव्हाण, निलेश टाके, साधना सारड, कृष्णा ठाकरे, प्रदीप गुल्हाने, आशिष गायकी, कुणाल पटले, विकास गर्जे व कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ […]

– भ्रष्टाचारी सुनील केदारचा दलित विरोधी चेहरा पुढे नागपूर :- हिंगणा विधानसभा क्षेत्रातील सातगाव ग्रामपंचायतच्या दलित महिला उपसरपंचाला अभद्र भाषेत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या सरपंच योगेश सातपुते याच्यावर पोलिसांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र भर सभेत सरपंच योगेश सातपुते याच्या कृत्याचे समर्थन करून आरोपीच्या केसाला जरी धक्का लागला तर नागपूर जिल्हा पेटवून टाकू, अशी चिथावणीखोर भाषेत धमकी देणाऱ्या भ्रष्टाचारी सुनील […]

– राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन नवी दिल्ली :- ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जय घोषाने कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदन आज दुमदुमले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली . गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तीमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले. महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने काॅपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र […]

मुंबई :- राजे उमाजी नाईक जयंती दिनानिमित्त त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

– राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे मुंबई :- गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, […]

मुंबई :- पर्युषण हा केवळ जैन धर्माचा उत्सव नसून तो संपूर्ण मानवतेच्या आंतरिक शुद्धीचा उत्सव आहे. केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे आहे. स्वतःसोबत निरपेक्ष सेवाभावाने इतरांसाठी जगल्यास प्रगत समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेच्या वतीने मुंबई येथे आयोजित ‘पर्युषण महोत्सव 2024’ शनिवारी संपन्न झाला, […]

नागपूर :- राजे उमाजी नाईक यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात आज साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतीयेळे, उपायुक्त पुरवठा अनिल बनसोड तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

– भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी अवतरण दिन वर्षानिमित्त  – कविवर्य सुरेश भट सभागृहात संमेलन उत्साहात साजरे नागपूर :- भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांची जन्मभूमी ही गुजरातमध्ये तर कर्मभूमी महाराष्ट्र होती. येथूनच त्यांनी संपूर्ण भारतासह अफगाणिस्थानपर्यंत आपल्या महानुभाव पंथाचा, धर्माचा प्रसार व प्रचार केला. धर्मावरच्या चर्चा सर्वसामान्यांपर्यंत पोहचाव्यात, त्यांना धर्माचे आकलन व्हावे यासाठी त्यांनी आपल्या बोलीभाषेचा अर्थात मराठीचा आग्रह […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. श्यामकुमार बर्वे यांच्या कार्यावर विश्वास ठेवुन भाजप पदाधिकारी चंदु ठाकरे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला. स्थानिय कांद्री- कन्हान येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी रामटेक लोकसभेचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या कार्यावर विश्वास ठेवुन काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यां मध्ये चंदु ठाकरे,अजय राय, सागर सरोजकर, आदित्य सोमकुवर, राहुल शर्मा, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रभाग क्र 16 येथील शिव छत्रपती नगर येथे आयोजित तान्हा पोळा कार्यक्रमात निरीक्षण म्हणून शिक्षिका रायबोले यांनी उत्कृष्ट नंदीबैल सजावट व वेशभूषा केलेल्या बालकांची निवड केली.दरम्यान लकी ड्रा द्वारे प्रणित पडोळे यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाले .पुरस्कार म्हणून प्रणित पडोळे यांना सायकल भेट देऊन पूरस्क्रुत करण्यात आले तर द्वितीय पुरस्कार […]

– आतापर्यंत २६५४ खड्डे बुजविले : झोननिहाय कार्यवाही सुरू नागपूर :- शनिवारी ७ सप्टेंबरला श्री गणेशाची स्थापना होणार आहे. याआधीपासूनच शहरातील विविध भागात स्थापन करण्यात येणा-या मोठमोठ्या गणेशमूर्ती नेण्यात येतात. याशिवाय श्री गणरायाच्या आगमनानिमित्त मिरवणूक देखील काढली जाते. नागपूर शहरातील श्री गणेशाच्या सर्व मिरवणुकीच्या मार्गांवरील खड्डे बुजविण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात आलेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आजपासून सुरू झालेला दहा दिवसीय श्री गणेशोत्सव तसेच आगामी काही दिवसानंतर होणाऱ्या ईद ए मिलाद यासारखे सणोत्सव साजरे होणार आहेत.तरी नागरिकानी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आगामी सणोत्सव सलोख्याने व शांततेत साजरे करावेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे .महापूरुषांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या भूमीत गणेशोत्सवासह आगामी उत्सव सन मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा परंपरागत चालत आलेला भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया म्हणजेच ‘हरितालिका पूजन’ कार्यक्रम कामठी तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. तर अखंड सौभाग्याचे वरदान मिळावे यासाठी मोठ्या संख्येतील सुवासिनींनी कामठी छावणी परिषद हद्दीतील श्री तीर्थक्षेत्र महादेव घाट कन्हान नदीत हरितालिकेची पूजा करीत गौरीविसर्जन केले .तसेच ग्रामीण भागात सोयीच्या ठिकाणी गौरीविसर्जन करण्यात आले. या हरितालिका गौरी […]

– आदर्श शिक्षक, फेलोशिप प्राप्त विद्यार्थी व विविध संस्थांचा सत्कार मुंबई :- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कौशल्य विकसीत केले जात आहे. रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देणे हे या विद्यापीठाचे यश आहे असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कौशल्य रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य […]

मुंबई :- ग्रामीण सक्षमीकरणाद्वारे राज्यातील एक हजार गावांना स्वयंपूर्ण करणाऱ्या ‘स्वदेस ड्रीम व्हिलेज’ या उपक्रमाच्या विस्तारासाठी आज महाराष्ट्र शासन आणि स्वदेस फाऊंडेशन यांच्या दरम्यान सहकार्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. या करारावर महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच स्वदेस फाऊंडेशनच्या संस्थापक संचालक झरीन स्क्रूवाला यांनी स्वाक्षरी केल्या. याप्रसंगी […]

– ग्रामीण महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला मिळेल चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई :- श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह राज्याच्या ग्रामीण भागातील ८ देवस्थानांच्या सुमारे २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या […]

– सेमीकंडक्टर, इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत गुंतवणूक; २९ हजार रोजगार निर्मिती,इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या प्रकल्पांमुळे सुमारे […]

नागपूर :-दि.६/९/२४ रोजी दुपारी ३.०० वा नागपूर शहराचे  पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना फुटाळा तलाव संरक्षण समितीने १०१ किलो वजनाची पर्यावरणपूरक तुरटीची गणेश मूर्ती सप्रेम भेट म्हणून दिली. या मागचा उद्देश हा आहे की,पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण संदेश नागपूरकरांना देणे होय. पोलीस आयुक्त यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करून नंतर विसर्जनाचा महत्त्वाचा मुद्दा यावेळी मांडला. पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले […]

मुंबई :- राज्यात नोव्हेंबर, २०२३ ते जुलै, २०२४ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष एकोणतीस हजाराच्या मदतीचा निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळणार असून याबाबतचा शासन निर्णय आज ५ सप्टेंबर २०२४ रोजी जारी करण्यात आला आहे, […]

मुंबई :- गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक कोकणात जातात, या पार्श्वभूमीवर कोकणात जाणा-या मार्गावर वाहतूक सुरुळीत राहण्यासाठी जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी आज या संदर्भात मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मंत्री चव्हाण म्हणाले की, गणपतीसाठी मोठ्या संख्येने कोकणवासी आपल्या गावाकडे जातात, त्यामुळे या काळात या मार्गांवर वाहतूकीचे प्रमाण अधिक असते, […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com