कोरोनाच्या तिस-या लाटेच्या अनुषंगाने घेतला आरोग्य व्यवस्थेचा आढावा नागपूर, ता. ५ : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीयंटचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाच्या या तिस-या लाटेपासून नागपूर शहरातील नागरिकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने लसीकरण आणि कोरोना चाचण्यांवर जास्तीत जास्त भर द्या, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.             कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटसह आलेल्या तिस-या लाटेच्या अनुषंगाने महापौरांनी बुधवारी (ता.५) आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय […]

चंद्रपूर, ता. ५ : शहरातील १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सोमवार, दि. ३ जानेवारीपासून जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु झाली. ही मोहीम यशस्वी व्हावी आणि पालकांमधील गैरसमज दूर व्हावे, यासाठी शहरातील डॉक्टरांनी जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीसाठी जनजागृती केली.  ही लसीकरण मोहीम शहरातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांमध्ये  राबविण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेची अमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व शासकीय आणि […]

5 जानेवारी 2022: भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’साठी 2021 हे अगदीच अविस्मरणीय वर्ष ठरले. 2 कोटी डाउनलोड्सचा टप्पा गाठत कू वेगाने वाढणारा भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून लोकप्रिय होतो आहे. ‘कू’चा बहुभाषिक मंच भारतीयांना मातृभाषेत व्यक्त होण्यासाठी अवकाश मिळवून देतो. ‘कू’ने मागच्या वर्षभरात विविध पातळ्यांवर अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. त्याची ही झलक. 2 कोटी डाउनलोड्स डिसेंबर 2021 च्या मध्यावधीत ‘कू’ने 2 […]

 नागपूर,ता. ५ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (५ जानेवारी) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ६६ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ३३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४२९०९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९८,१३,५००/- चा दंड वसूल केला आहे.           शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला […]

चंद्रपूर – शहर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून श्री. विपीन पालीवाल (मुद्दा) यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी, (ता. ३ जानेवारी)  नगर विकास मंत्रालयाने जारी केले.  ४ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका या पदावर श्री. विपिन पालीवाल (मुद्दा) (मुख्याधिकारी गट-अ निवड श्रेणी) यांची प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात येत आहे, असे […]

रामटेक –   विद्यासागर कला महाविद्यालय खैरी  (बिजेवाडा) रामटेक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले महिला अद्यसन व रोजगार मार्गदर्शन केंद्र व महिला तक्रार निवारण समिती यांच्या  संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची विधीवत सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ज्योती कवठे यांनी केले. कार्यक्रमाचे  […]

–   नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक 5 बी निष्कासित –   पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ             मुंबई : नायगाव येथील बीडीडी चाळ पाडल्यानंतर रिक्त जागी होणाऱ्या नव्या इमारतींच्या बांधकामामुळे नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच जलद गतीने पूर्ण करून मार्गी लावला जाईल, असे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.             मुंबईतील नायगाव बीडीडी […]

नागपूर  : नागपूर शहरात होणाऱ्या अवैध वृक्षतोडीविरोधात मनपाने कठोर पाउल उचलले आहे. अवैधरित्या झाडांच्या फांद्या तोडणे, वृक्ष तोड करणाऱ्यांविरोधात नागपूर महानगरपालिकेतर्फे पोलिस तक्रार करण्यात येणार आहे. यासंबंधी मंगळवारी (ता.४) महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला सक्त निर्देश दिले असून ज्या प्लॉटमध्ये व इतर ठिकाणी अवैधरित्या वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यांच्याविरोधातही पोलिस तक्रार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच उपद्रव शोध पथक सुध्दा याबद्दल कारवाई […]

   नागपूर :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर द्वारा लोक गीत व लोक नृत्य विभाग स्तरीय युवा महोत्सवाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.             कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळत हे आयोजन करण्यात आले आहे. 4 जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या या आयोजनामध्ये नागपूर विभागातून लोक नृत्य गटात मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील चमू […]

खापरखेड़ा – सावनेर तालुक्यातील चनकापुर येथे  कन्हान नदीपात्रातून अवैध्यरीत्या रेतीचे उत्खनन करुण साठा करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पुलिस यांनी धाड टाकली. यावेळी 60 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला आहे असुन अवैध रेती साठा करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन खापरखेडा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की मिलन चौक चनकपुर […]

15 ते 18 वयोगट ; 14 हजार लसीकरण नागपूर दि. 03 : नागपूर जिल्हा प्रशासनाने वाढते रुग्ण लक्षात घेतात बाजारातील बेपर्वा वृत्तीच्या लोकांवर कारवाई करणे सुरू केले आहे. आज कळमना बाजार परिसरात विना मास्क गर्दी करणाऱ्या 16 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर दंड न भरू न शकणाऱ्या दहा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटात […]

-जिल्हा व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित घ्याव्यात -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सुचना मुंबई दिनांक ३: राज्यात व्याघ्र संरक्षणासाठी महावितरण, पोलीस, महसूल तसेच वन विभागासह सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करावे तसेच जिल्हास्तरावर पोलीस अधिक्षक‍ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित स्वरूपात घ्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाची दूरदृष्यप्रणालीद्वारे […]

नागपूर : दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात १४ विविध खेळाचे मैदाने एकात्मीक पध्दतीने ‘नासुप्र’व्दारे विकसित करण्यात आले आहेत. त्यापैकी हनुमान नगर त्रिकोणी मैदान बास्केटबॉल ग्राउंडला मा. श्री. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री यांनी दिनाकं ०१ जानेवारी रोजी भेट दिली. त्यांचे  स्वागत नासुप्रचे सभापती तथा ‘नामप्रविप्रा’चे आयुक्त मा. श्री. मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी श्री. नितीन गडकरी यांचे स्वागत केले. सदर मैदानात नॅशनल लेवलचे […]

-मृतक नागपुरातील रहिवासी -लष्करातील शिक्षक कुटुंबासह निघाले होते रिवासाठी -इतवारी रीवा एक्सप्रेसमधील घटना नागपूर – धावत्या रेल्वेतून पडून आई आणि बाळाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रात्री ८ वाजताच्या सुमारास तिरोडा आणि तुमसर दरम्यान घडली. पुजा रामटेके (२६) असे मृत महिलेचे नाव आहे. तर मृतक बाळ केवळ १४ महिण्यांचा आहे. इतवारी रीवा एक्सप्रेसने प्रवास करीत असताना ही घटना घडली. रामटेके […]

भंडारा, दि. 3 : कोरोना तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्ह्यातील फार्मासिस्ट असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि नर्सिंग कॉलेज प्रतिनिधी यांची सभा घेतली. जिल्ह्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असून व ओमायक्रोनचा प्रसार हा अधिक वेगाने होत आहे. हे लक्षात घेता यावेळी अधीकचे मनुष्यबळ लागणार आहे. अशावेळी नर्सिंग कॉलेजच्या व्यवस्थापकांनी तयारीत राहावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. खाजगी इस्पितळात […]

-पहिल्याच दिवशी 788 मुला-मुलींना लस भंडारा, दि. 3 : आजपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 788 मुला-मुलींना लस देण्यात आली. 373 मुले तर 415 मुली लसवंत झाल्यात. मॉयनारीटी हॉस्टेल येथे अरुंधती तुरस्कर, यामीनी बैस, मयंक चावरे, प्रतिक्षा मानापूरे यांना लस देण्यात आली. भंडाऱ्यात जिल्हा रुग्णालय भंडारा, साकोली उपजिल्हा रुग्णालय, लाखनी ग्रामीण रुग्णालय, […]

नागपूर  : महिलांच्या उध्दांरासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोध्दाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणा-या, सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणा-या २ जानेवारी फुले दांपत्य दिवस तसेच अग्रणी सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी ही जयंती यानिमित्त  सुदर्शन नगर, घोडके प्राथमिक शाळा, न्यु नरसाळा रोड येथे मोठया उत्साहपूर्ण वातावरणात सौ.सुनंदा प्रदीप रायपूरे यांच्या अथक प्रयत्नाने फुले दांपत्य हा […]

-१५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण केंद्राला दिली भेट नागपूर, ता. ३ : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सोमवार, ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी विविध लसीकरण केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. महापौरांनी राजकुमार गुप्ता समाजभवन बजेरिया आणि सेंट उर्सूला गर्ल्स हायस्कुल, सिव्हिल लाईन्स येथे भेट दिली. त्यांच्यासोबत महिला […]

 मुंबई, दि. 3 : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ सुरू केलेली आहे. या योजनेकरिता सन २०२०-२१ व २०२१-२२ करिता पात्र विद्यार्थ्यांनी स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण भरलेला अर्ज  इतर कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर यांच्याकडे ३१ जानेवारी २०२२ पर्यंत  पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.           सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास […]

-सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा १६ जानेवारी 2022 रोजी होणार                  मुंबई, दि.3 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 9 डिसेंबर 2021 पासून करण्यात आली आहे.इच्छुक  उमेदवारांनी 7 जानेवारी 2022 अर्ज करावे. सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा रविवार, 16 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत घेण्यात येणार आहे, असे राज्य प्रशासकीय व्यवसाय […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com