महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात असून 98.92 टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत बचत भवनातील स्ट्राँग रूम उघडण्यात आली. मतपत्रिकांची सरमिसळ, गठ्ठे बांधण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून चार टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली आहे.   दिनेश दमाहे  9370868686 dineshdamahe86@gmail.com

नागपुर –  १४ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीसाठी माध्यम प्रतिनिधीची व्यवस्था छत्रपती हॉलमध्ये करण्यात आली आहे. फक्त निवडणूक आयोगाकडून प्रवेशिका मिळालेल्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रवेश मिळणार आहे. प्रवेशद्वारावर आपली यादी दिली आहे. आपल्याजवळील हिरव्या रंगाची प्रवेशिका दाखवून आपल्याला प्रवेश मिळेल. या ठिकाणी बैठक व्यवस्था, संगणक सुविधा व खानपानाची व्यवस्था केली आहे. मतमोजणीची प्रत्यक्ष प्रक्रिया ८ वाजता सुरू होईल. माध्यम कक्षात आपले […]

नागपूर :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या 14 डिसेंबर रोजी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उदया मंगळवारी सकाळी 8 वाजता पासून मतमोजणी प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सुरुवात होईल. उदया दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल अपेक्षित आहे.              या निवडणुकीत 10 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी 98.93 टक्के इतकी होती. […]

नागपुर :-  प्रत्येक विभागाला त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या कार्यालयामध्ये जेथे दहा किंवा दहापेक्षा जास्त कर्मचारी आहेत. अशा आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य असल्याचे अतिरीक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी महिलांचे लौगिक छळापासुन संरक्षण ( प्रतिबंध,मनाई व निवारण ) कायदा 2013 या कायद्यान्वये शासकीय खाजगी सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याच्या अनुंषंगाने अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या दालनात सर्व […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. १३ डिसेंबर) रोजी ०३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २४,००० चा दंड वसूल केला. पथकाने ३८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

                           दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम                          दोन हजार लाभार्थ्यांची तपासणी                          एक हजार 911 दिव्यांगत्व प्रमाणपत्र, युडीआयडी कार्ड वितरण             […]

चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या उषाताई बुक्कावार यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे.    चंद्रपुरातील उषाताई बुक्कावार या बहुआयामी व्यक्तिमत्व असून, विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सेवा केली आहे. त्यांना बागकामाची आवड आहे. १९९२ पासून त्या बागकामाचे प्रशिक्षण घेतात. २००२ मध्ये त्यांनी महिला संस्कार कलशची स्थापना केली. यात 400 भगिनीचा सहभाग […]

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानांअंतर्गत दुर्गापूर रोड तुकूम येथे येथील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय परिसरात “माझा कचरा; माझी जबाबदारी” कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पर्यावरण विषयक जनजागृती व श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालयाच्या परिसरात नागरिकांकडून कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. घरातील खरकटे व शीळे अन्न, मृत जनावरे व प्लास्टिक कचरा येथे नागरिकांकडून […]

तर भाजप नेत्यानी मोदी सरकारकडुन इंपिरिकल डाटा राज्य सरकारला मिळवुन द्यावा. नागपुर – मा.सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसी आरक्षणाबाबत काढलेल्या राज्य सरकारच्या वटहुकुमाला स्थगिती दिल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात येण्यास केवळ भाजप शासित केंद्र सरकार जवाबदार असल्याचे मत ओबीसी अभ्यासक डॉ ऍड अंजली साळवे यांनी व्यक्त केले. देशात सर्वत्र ओबीसी आरक्षणावर […]

–रामटेक परिसराच्या विविध समस्या, विशेषतः रामटेक परिसराच्या पर्यटन विकासाचे रखडलेले काम सुरू करण्याच्या मागणीसाठी हे उपोषण  रामटेक :- रामटेकचे माजी आमदार आणि भाजप नेते डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे 21 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या वाढदिवशी रामटेक विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांवरून एकदिवसीय उपोषणाला बसणार आहेत….  या आधी  रेड्डी मनसरचा टोल नाका हटवण्यासाठी उपोषणाला बसले होते. काही दिवसांनी सरकारला हा टोलनाका येथून हटवावा लागला. […]

भंडारा : कोरोनाचा प्रादुर्भाव, एस. टी. महामंडळाचे राज्यव्यापी संप व आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्यात 14 ते 28 डिसेंबर 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत पुढीलप्रमाणे निर्बंध लावण्यात आले असून यात शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा […]

नागपुर – जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ (केंद्रीय व जिल्हा समिती) च्या वतीने जैन कलार समाजभवन, रेशीमबाग, नागपूर येथे स्वातंत्रता संग्राम सेनानी, माजी आमदार, माजी महापौर व समाज भूषण स्व. रा. पै. समर्थ (गुरुजी) यांच्या अर्धाकृती प्रतिमेचे अनावरण आणि जैन कलार समाज न्यासात नमूद असलेले सर्व मा. देणगीदारांचा सत्कार समारंभ यशस्वीपणे आयोजित केले. मा. श्री. यादवराव शिरपूरकर (माजी अध्यक्ष-जैन कलार समाज) यांच्या शुभहस्ते आणि […]

नागपुर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा ८१ वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर च्या वतीने सुरेश भट सभागृह येथे व्हरचुअल रॅली च्या माध्यमातून ऑनलाईन साजरा करण्यात आला.यावेळी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील प्रमुख मान्यवरांचे प्रोजेक्टच्या माध्यमातून मनोगत लाभले. आदरणीय मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आला. यावेळी […]

भंडारा : शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2021-22 मधील धान खरेदीसाठी 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत NEML पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याकरीता शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली होती. परंतू सदर कालावधीत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे काही शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले होते व त्यानंतर या हंगामात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करता येत नव्हते. […]

मुंबई : पोलिस दलास कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी होमगार्डची मोठ्या प्रमाणावर मदत होते. राज्यात कार्यरत  होमगार्डना नियमित स्वरूपात 180 दिवस काम देण्यासाठी विशेष धोरण तयार करण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या. होमगार्ड आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीत होमगार्डसाठी असलेले अनुदान, कर्तव्य भत्ता अदा करण्यासाठी नियमित निधी […]

‘माझी वसुंधरा अभ्यासक्रम’ शालेय शिक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द मुंबई – : शिक्षण म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रम नसून त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडविणे याला अधिक महत्त्व आहे. वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी पर्यावरण विभागाने अतिशय उपयुक्त अभ्यासक्रम तयार केला असून शालेय शिक्षण विभाग त्याची कालबद्ध अंमलबजावणी करून आपली जबाबदारी निश्चित पूर्ण करेल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्याच्या पर्यावरण […]

गडचिरोली – गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने, येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाही. शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ येथील गरजु आदिवासी नागरिकांना मिळावा यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणुन मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या संकल्पनेतून व मा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख […]

 पुणे –  विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्यानंतर स्नातकांनी आपल्या प्रदेशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तेथील भाषेत विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान उपलब्ध करून दिल्यास ती देशाची मोठी सेवा ठरेल आणि नव्या पिढीला त्यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय  विद्यापीठाच्या 18 व्या पदवीदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला कुलपती डॉ.एस.बी. मुजुमदार, मुख्य संचालिका आणि  प्र-कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर,  कुलगुरू […]

एनसीपी अ‍ॅपचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन… विद्यार्थी संघटनेच्या ‘महाराष्ट्र युथ कार्निव्हल’ लोगोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण… मुंबई  – शाहू – फुले – आंबेडकर यांची दूरदृष्टी समाजाला पुढे नेण्याची होती त्यांच्या या दुरदृष्टीच्या सुत्रावरच आमचा राष्ट्रवादी पक्ष काम करतोय असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. आज नेहरू सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय […]

भारतीय शास्त्रीय संगीत केवळ मनोरंजन नाही तर आत्मानुभूती  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भारतीय शास्त्रीय संगीत केवळ मनोरंजन किंवा करमणुकीचे साधन नसून ती आत्मानुभूती असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले. श्री षण्मुखानंद ललित कला व संगीत सभेतर्फे आयोजित कार्यक्रमात शनिवार (दि. ११) राज्यपालांच्या हस्ते शास्त्रीय संगीत क्षेत्रातील देशभरातील ५० युवा कलाकारांना श्री षण्मुखानंद एम एस सुब्बलक्ष्मी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या, त्यावेळी राज्यपाल […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com