– सप्ताहादरम्यान मोफत तपासणी नागपूर दि.08 : सिकलसेल या गंभीर आजाराबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत सिकलसेल नियंत्रण सप्ताहाचे आयोजन  प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुगणालय, डागा स्त्री रुग्णालयात करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी या सप्ताहादरम्यान तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोगय अधिकारी  डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे. या सप्ताहादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, […]

मुंबई – ओमायक्रॉन विषाणुच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. महाराष्ट्राने सध्या 12 कोटीं 3 लाख 18 हजार 240 डोसेस दिले असून 4 कोटी 37 लाख 46 हजार 512 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.  7 कोटी 65 लाख 71 हजार 728 लोकांनी एक डोस घेतला आहे.  18 ते 44 वयोगटात 76.69 लोकांनी कमीत कमी 1 डोस तर 45 पेक्षा अधिक वयोगटातील 85.25 टक्के लोकांनी एक डोस घेतलेला आहे.  गेल्या 12 तासात संपूर्ण जगात ओमायक्रॉनच्या रुग्णात 45 टक्के […]

मुंबई – कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातंर्गत असलेल्या  महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ व  महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थांचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण मंडळ निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या स्थापनेमुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींप्रमाणे शालेय शिक्षणासोबत कौशल्य शिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू […]

मुंबई – राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यानुसार बाजार समितीवर संचालक निवडून देण्यासाठी ज्या बहुउद्देशिय  सहकारी संस्था त्यांच्या सदस्यांना पीक कर्ज वितरीत करतात त्यांनाच मतदानाचा अधिकार देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. बाजार समितीवर नियुक्त करावयाच्या अशासकीय […]

मुंबई –  महाराष्ट्र राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150 विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीसाठी विद्यावेतनावर इंटर्न म्हणून घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.  मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था कार्यरत आहेत. तेथे बी. एस्सी व एम. एस्सी […]

रामटेक :- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेचा २१ व्या वर्षातील गुनिजन गौरव महापरिषद पुरस्कार निवड समितीने रामटेकचे दीपक शंकरराव उपाध्ये यांना राज्यस्तरीय आदर्श कऱ्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२१ ने सन्मानित केलं आहे. हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडला.दीपक शंकरराव उपाध्ये हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी नागपूर येथून सेवा निवृत्त झाले आहेत, त्यांनी अखिल  पंचायत च्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांना न्याय मिळवून दिला , भ्रष्टाचार […]

– राज्य निवडणूक आयोगाची सर्व महानगरपालिका प्रशासनाला सूचना चंद्रपूर : महानगरपालिकेच्या २०२२ या वर्षात होणाऱ्या निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांबरोबरच संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाद्वारे नुकत्याच झालेल्या आभासी बैठकीत करण्यात आले.आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाद्वारे राज्यातील सर्व महानगरपालिका अधिकारी आणि जनसंपर्क अधिकाऱ्याची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपायुक्त अशोक गराटे, सिस्टम मॅनेजर […]

नागपूर :  विभागीय आयुक्त कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी शैलेंद्र मेश्राम यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (पुनर्वसन) रश्मी माळी, तहसीलदार अरविंद शेलोकार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

चंद्रपूर : सध्या हिवाळ्यामुळे थंडी वाढली असून, उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये, थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास बेघर बांधवांना मनपाच्या बेघर निवारा गृहात आणण्यात येऊन त्यांची व्यवस्था करण्यात येत आहे.  महाराष्ट्रामध्ये हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरी बेघरांना थंडीपासून संरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी नागरी भागातील […]

नागपूर :  समाजाला कीर्तन -अभंगाच्या माध्यमातुन शिकवणी देणारे संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंती निमित्त नंदनवन चौक स्थित प्रतिमेला मा.महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तदनंतर नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये संताजी जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राला महापौर श्री.दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. रविंद्र भेलावे, उपायुक्त श्री. विजय देशमुख, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी […]

नागपूर : सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात बुधवार, दिनांक ०८ डिसेंबर रोजी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त श्री. मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याहस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नामप्रविप्रा’चे अधिक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी श्री. अनिल राठोड, आस्थापना अधिकारी तथा मुख्य […]

नागपूर : कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’या नवीन विषाणूबद्दल केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासननाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय विमानातून नागपुरात येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी विमानतळावर केली जात आहे. या नवीन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता परदेशातून येणाऱ्या नागरिकांनी स्वत:सह इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.             पुढे ते म्हणाले, मनपाला इमीग्रेशन विभागाकडून परदेशातून भारतात येणाऱ्या आणि ज्यांच्या पासपोर्टवर नागपूरचा पत्ता […]

  मुंबई  :  – संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.           आज मंत्रालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

“महिला आयोग आपल्या दारी” जनसुनावणीमधे अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्या – रुपाली चाकणकर यांचे आवाहन गडचिरोली : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी शुक्रवार दि. १०/१२/२०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, कोम्प्लेक्स एरिया, गडचिरोली येथे दुपारी १२.०० वाजता होणार असून आयोगाच्या मा.अध्यक्षा रुपाली चाकणकर या स्वतः तक्रारींची सुनावणी घेणार […]

मुंबई – युवक काँग्रेसच्या निवडणुकीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून महावितरणच्या यंत्रणेचा वापर केला जात आहे. या निवडणुकीत त्यांचा मुलगा उभा असल्याने राऊत यांनी महावितरणच्या यंत्रणेचा बेकायदेशीरपणे वापर सुरू केला आहे. युवक कांग्रेस निवडणुकित उर्जा  मंत्री नितीन राऊत यांच्याकडून महावितरणच्या यंत्रणेचा वापर केला जात आहे. या निवडणुकीत त्यांचा मुलगा उभा असल्याने राऊत यांनी महावितरणच्या यंत्रणेचा बेकायदेशीरपणे वापर सुरू केला आहे, […]

-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीने कामकाजाला गती देवून राज्यात ‘जादुटोणा विरोधी कायद्याची’ प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात ‘जादुटोणा विरोधी कायदा’ प्रभावीपणे राबविण्याबाबत बैठक पार पडली.या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.यावेळी सामाजिक न्याय व […]

मुंबई – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले,जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे पुनर्गठन  करण्यात येईल.या कायद्याची माहिती तसेच जनजागृती करणे तसेच जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांच्याशी चर्चा करून त्यांनी विभागासंदर्भात मांडलेल्या मुद्यांबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही यावेळी मंत्री श्री. मुंडे यांनी दिली. या कायद्याच्या प्रचारामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा,मानवता […]

      मुंबई : राज्यातील गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना पक्के व स्वत:च्या मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन राज्यात 20 नोव्हेंबर 2020 पासून महाआवास अभियानाची सुरूवात केली. या पहिल्या टप्प्यात 1260 पेक्षा जास्त बहुमजली इमारती, 630 पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच 750 घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. सोबतच  50 हजार 112 भूमीहिन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका अर्थाने महाआवास अभियानाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश पाहता दुसरा टप्पा दिनांक 20 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाला. यात 5 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. अन्य राज्याच्या तुलनेत हे महाआवास अभियान अधिक सक्षम आणि गतिमानतेने पुढे नेण्याचा निर्धार करत या पूर्ण अभियानात 7 डिसेंबर 2021 पर्यंत संपूर्ण राज्यात प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजनेच्या 9 लाख 88 हजार 691 घरांकरिता मंजुरी देण्यात आली असून 7 लाख 43 हजार 326 घरे पुर्ण झाली आहेत. दिनांक 20 नोव्हेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील 1071 घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे तर 4 हजार 684 घरे पूर्ण झाली आहेत. राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना अशा विविध योजनेमार्फत 4 लाख 19 हजार 833 घरांकरिता मंजुरी देण्यात आली असून दिनांक 7 डिसेंबर 2021 पर्यंत 2 लाख 95 हजार 941 घरे पुर्ण झाली आहेत. 20 नोव्हेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 या महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्य पुरस्कृत आवास योजनेतील 1 हजार 902 घरे बांधण्यात आली आहे. उर्वरित घरे विहित मुदतीत पूर्णत्वाकडे जातील, असा विश्वास ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे यांनी व्यक्त केला आहे.

-पालकाकडून आरोपी विरोधात तक्रार  पोलिसां चा संशयास्पद व्यवहार. कामठी – कामठी तालुक्यातील  रनाळा गावातील प्रोफेसर कॉलनी येथील मैदानात क्रिकेट खेळत असताना वाल कंपाऊंड मध्ये गेलेला चेंडू बद्दल अश्लील शिवीगाळ करीत   बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्ती बद्दल नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली नवीन  पोलिस स्टेशन कामठी  मधून मिळालेल्या माहितीनुसार रनाळा येथील प्रोफेसर कॉलनी मैदानात गावातील प्रत्येक कॉलनीतील मुलं […]

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये  केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या प्रथम फेरी उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार जागा वाटप करण्यात आलेली असून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत EWS, NCL आणि CVC/TVC आत मूळ प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची,  माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.             याबाबत विद्यार्थी व पालक यांची मागणी, कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक असलेल्या संबंधीत विविध प्रमाणपत्र […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com