यवतमाळ :- विविध प्रकारचे संकटग्रस्त, अत्याचारग्रस्त, हरवलेल्या, मदतीची आवश्यकता असलेल्या बालकांसाठी १०९८ हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. बालकांना मदतीची आवश्यकता असल्यास या हेल्पलाईचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या आजूबाजूला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके, सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत आवश्यक मदत कोठून व कशी […]

चंद्रपूर :- आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन,पोलीस विभाग व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे मूर्ती विसर्जन स्थळी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची गुरुवार २९ ऑगस्ट रोजी संयुक्तरित्या पाहणी करण्यात आली.याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी आवश्यक त्या सुधारणा सूचित करून पुढील तीन ते चार दिवसात संपूर्ण व्यवस्था निश्चित करण्याचे निर्देश दिले. येत्या ७ सप्टेंबर पासुन गणेशोत्वास सुरवात होत असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या […]

नागपूर :- महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने सुरु झालेली महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ही आशु नेवारे सारख्या गरीब व होतकरु मुलींसाठी वरदान ठरली आहे. पदवी शिक्षण घेणाऱ्या आशु नेवारेला या योजनेच्या आर्थिक लाभाने नवी उमेद मिळाली आहे. रामटेक तालुक्यातील पवनी येथील आशु नेवारे हिला स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करीत असताना या योजनेच्या आर्थिक लाभाने बळ मिळाले. घेतलेल्या […]

– आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन नागपूर :- नागपूर महानगरपालिका परिवहन विभाग आणि जनआक्रोश यांच्या संयुक्त विद्यमाने आपली बस चालकांसाठी आयोजित “डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग” याविषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन गुरुवारी (ता:२९) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. धरमपेठ येथील ट्राफिक चिल्ड्रनस पार्क येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, […]

– प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळवून देण्यासाठी महत्वाचा पुढाकार नागपूर :- राज्य शासनाची महत्वाकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या” अर्ज स्वीकृती बाबत नागपूर महानगरपालिकेने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. शहरातील प्रत्येक लाभार्थी महिलेला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वात महत्वाचा पुढाकार घेण्यात आला. त्याचा फायदा देखील मिळाला आहे. नागपूर शहरातील चार लाखावर महिलांचे […]

– लोणी येथे वैरण विकासची पाहणी यवतमाळ :- पशुधनासाठी गावातच चांगल्या दर्जाचे वैरण उत्पादन व्हावे यासाठी गायरान जमिनीवर वैरण विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातून ग्रामीण भागात पशुपालनास चालना मिळेल, असे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अँड.निलेश हेलोंडे पाटील यांनी सांगितले. बदलते वातावरण तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पशुधनास मुबलक चारा मिळावा तसेच चारा टंचाईवर उपाययोजना म्हणून गायरान ई-क्लास […]

मुंबई :- लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणूनबुजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे. योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार याने लाडकी बहिण योजने विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वडपल्लीवार यांच्या मार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी, लाडकी बहिण योजनेविरोधातील त्यांचा अजेंडा राबवत आहे असा घणाघात भारतीय […]

– लोकांच्या समस्येवर समाधान शोधण्याचे त्यांचे कार्य – माणिकराव ठाकरे लिखीत पुस्तकाचे थाटात प्रकाशन यवतमाळ :- ग्रामपंचायत सदस्य ते विविध खात्यांचे राज्यमंत्री, युवक काँग्रेससह प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विधानपरिषदेचे उपसभापती तर, तेलंगणासह गोवा, दीवदमणचे पक्षप्रभारी अशा विविध पदांवर माणिकराव ठाकरेंनी काँग्रेस पक्षासाठी योगदान दिले. त्यांच्या कार्याबद्दल तुमच्यापेक्षा मी अधिक जाणत नाही. त्यांनी तुमच्या समवेत काम केले. मात्र, माणिकराव ठाकरे पक्षनिष्ठेचे मूर्तिमंत […]

– देश की एकता और शांति को खंडित करने का प्रयास हिंगना :- मुस्लिम समाज के धर्मगुरु के खिलाफ गलत शब्दो का उपयोग कर मुस्लिम समुदाय के खिलाफ जहर और नफरत फैलाने वाले रामगिरी महाराज को तुरंत गिरफ्तार करने की मांग को लेकर मंसूरी जमात नागपुर कि ओर से राष्ट्रपति और राज्यपाल को जिलाधिकारी के माध्यम से तथा नागपुर पुलिस […]

नागपूर :- शेतक-यांचा सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी, कमी खर्चात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रधानमंत्री कुसूम ‘ब’ सौर कृषी पंप योजना राबवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा आणि तीही मोफत वीज तर मिळणार आहेच पण सौर पंप उभारण्यासाठी अनुदानाचाही हातभार मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यात या योजनेंयर्गत 363 शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी मिळाली आहे. तर 204 ग्राहकांनी पैश्याचा भरणा केला असून 35 शेतकऱ्यांकडे […]

राजनांदगांव :-खेल एवं युवा कल्याण विभाग एवं जिला हॉकी संघ राजनांदगांव तथा समस्त खेल संघ के संयुक्त तत्वधान में हॉकी के जादूगर मेजर ध्यानचंद जी की जयंती खेल दिवस के रूप में नगर के खेल प्रेमियों द्वारा द्वारा उतसाहपूर्वक मनाई गई इस अवसर पर सुबह 7:00 बजे अन्तरस्ट्रीय हॉकी स्टेडियम से समस्त खेल से जुड़े खिलाड़ियो द्वारा रैली निकाली गई […]

नागपूर :- नुकतेच कन्यारत्नाचे सुख प्राप्त झालेल्या कल्पना कोडवते यांनी मुलीच्या भविष्याची काळजी म्हणून काही योजना आखल्या आणि त्याला साथ मिळाली ‘मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण योजने’ची. अशा शब्दांत नागपूर जिल्ह्याच्या कल्पना कोडवते यांनी समाधान व्यक्त केले. रामटेक तालुक्यात पेंच व्याघ्र प्रकल्पा लगतच्या सिल्लारी गावातील कल्पना कोडवते यांच्या बँक खात्यात या योजनेंतर्गत रक्षाबंधनाच्या दिवशी 3000 रुपये जमा झाले. हे पैसे व यापुढेही […]

नवीमुंबई :- कोकणातील गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि विना अपघाती व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील वाहनांची वर्दळ नियंत्रीत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबईचे अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ. सुरेश कुमार मेकला यांनी केले आहे. गणेशोत्सव काळात गणेश भक्तांना त्यांच्या गावी वेळेत पोहचता यावे व […]

मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या अकरा वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व […]

मुंबई :- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त मंगळवार, ३ सप्टेंबर २०२४ रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीबाबत आढावा बैठक विधानभवन येथे आज […]

– “उत्कृष्ट संसदपटू” आणि “उत्कृष्ट भाषण” पुरस्कारांचे वितरण – ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ ग्रंथाचे प्रकाशन  मुंबई :- महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधानपरिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांतील सन २०१९ ते २०२४ या कालावधीतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारप्राप्त सदस्यांना मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार […]

मुंबई :- शालेय विद्यार्थिनींसोबत घडणाऱ्या दुर्देवी घटना रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाच्या एकत्रित प्रयत्नांतून या उपाययोजनांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालविकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून लवकरच त्यातील निष्कर्षांवर चर्चा करुन उपाययोजनांचे सशक्तीकरण करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक […]

मुंबई :- सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची वास्तू जुनी झाली असून येथील प्रवासी सुविधांवरही मर्यादा येत आहेत. सातारा शहरातील बस स्थानकाची वास्तू पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी नवीन बस स्थानकाची निर्मिती करावी. यामध्ये प्रवासी सुविधांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. मंत्रालयीन दालनात आज सातारा बसस्थानक दुरूस्ती व सुशोभीकरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. […]

· 76000 कोटी रुपयांचा प्रकल्प · वाढवण हे देशातील सर्वात मोठे खोल पाण्यातील बंदर ठरणार · भारताची सागरी जोडणी वाढणार, जागतिक व्यापार केंद्र म्हणून स्थान मजबूत होणार नवी दिल्ली :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 30 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई आणि पालघरला भेट देणार आहेत. प्रधानमंत्री श्री.मोदी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024ला संबोधित करतील. त्यानंतर सिडको […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com