संदीप बलविर, प्रतिनिधी
– नागपूर व भंडारा वन विभाग ची संयुक्त कार्यवाही
– मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यांत
नागपूर :- भंडारा वन विभाग अंतर्गत भंडारा वन परिक्षेत्र मधील मनेगाव येथे सापळा रचून २ आरोपी सह वन्यप्राणी खवल्या मांजर नग १ जिवंत जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, गुप्तहेरांने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे कार्यालयाला दिलेल्या माहिती नुसार खवल्या मांजरची तस्करी होत असल्याची माहिती दिली. बनावट ग्राहक तयार करून आरोपी सोबत खलबत सुरु ठेवली. मंगळवार दिनांक ७ फेब्रु ला आरोपीने विक्रीची तयारी ठेवली असता वन विभाग नागपूर आणि भंडारा वन विभाग यांनी संयुक्त पथक तयार करुन सापळा रचून २ आरोपी आणि मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
आरोपी रामेश्वर माणिक मेश्राम वय ३२ वर्ष रा. तिद्दी पो. मानेगाव ता. जि. भंडारा व सचिन श्रावण उके वय २९ वर्ष, रा. खमारी पो. नेरी ता. मोहाडी जी. भंडारा याना ताब्यांत घेण्यात आले. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमाद्वारे वनगुन्हा नोदविण्यात आला आहे.
सबब कामगिरी मुख्य वनसंरक्षक नागपूर वन वृत्त नागपूर रंगनाथ नाईकडे,नागपूर वन विभाग उपवनसंरक्षक डॉ.भारत सिंह हाडां, भंडारा वन विभाग उपवनसंरक्षक राहुल गवई याचे मार्गदर्शनात विभागीय वन अधिकारी दक्षता पी जी कोडापे, सहायक वनसंरक्षक उमरेड नरेंद्र चांदेवार, वन परिक्षेत्र अधिकारी साकेत शेंडे, वन परिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, संजय मेंढे, विशेष पथक सदस्य वन परिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी, पी एन वाडे,वनरक्षक तावले, पडवळ, जाधव, शेंडे, यांनी सापळा यशस्वी केला. पुढील तपास सहायक वनसंरक्षक भंडारा साकेत शेंडे हे करीत आहेत.