नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. १३१, बेलदार नगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी अमोल प्रकाश कार्लेवार वय ३७ वर्ष है त्यांचे राहते घराला कुलूप लावुन लग्नाचे कार्यक्रमाकरीता बाहेर गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे यांचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून, बेडरूम मधील लोखंडी आलमारीत ठेवलेले रोख १.३५,०००/- रू. व सोन्याचे दागीने असा एकुण किंमती २,७४,०००/- रू चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे पोउपनि रामटेके यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.