नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. १०, न्यू गणेश नगर, बहादुरा रोड, वाठोडा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी शेख अफनान शेख अख्तर वय २० वर्ष हे आपले राहते घराला कुलूप लावुन परिवारासह नातेवाईकाचे अंत्यविधी करीता मोठा ताजबाग येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कडी कोंडा व कुलूप तोडुन, आत प्रवेश करून, बेडरूम मधील आलमारीतील रोख ५०,०००/- रू व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण १,५०,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि, राऊत यांनी अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३०५(अ), ३३१(३) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.