नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत राहणाऱ्या २० वर्षीय फिर्यादी ही घरी हजर असतांना, त्यांचे घरासमोर अंदाजे ५० वर्षीय एक ईसम हिरवा कुर्ता व हिरवी लुंगी घातलेला आला, व फिर्यादीला पिण्या करीता चहा मागीतला, फिर्यादीने चहा दिल्यावर तिला घरातुन तांदुळ आणायला सांगीतले, व त्यावर मंत्र मारून देतो तुमच्या घरामध्ये शांती राहील असे म्हटले. फिर्यादीने तांदुळ आणले असता, आरोपीने फिर्यादीस सोन्याचे दागिने डबल करून देतो असे विश्वासात घेवुन सांगीतले, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादी जवळील सोन्याने दागिने किंमती ७०,०००/- रू. ने घेवुन फिर्यादीनी नजर चुकवुन आरोपी दागिने घेवून पळून गेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे पोउपनि. कनसे यांनी आरोपीविरूध्द कलम ३१८(४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.