नागपूर :- फिर्यादी नामे प्रणय मुकेश डोळस वय १९ वर्ष रा. मुदलीयार चौक, श्रीहरी रोड, शांतीनगर, नागपूर याने त्याचा मित्र वैभव याची स्प्लेंडर गाडी क. एम.एच ४९ बी.ई ३६५० ही आणली होती. फिर्यादीचा मित्र नामे कार्तीक विलास मारोडे वय १६ वर्ष रा. मेश्राम हॉस्पीटल मागे, शांतीनगर घाट, नागपूर हा ती गाडी चालवित होता. फिर्यादी गाडी मागे बसुन दोघेही सुनिल हॉटेल, लकडगंज येथे जात असत्ता, ईतवारी स्टेशनचे समोरील रस्त्यावर त्यांचे मोटरसायकलला मॅक्सी अॅटो क. एम.एच ४९ ए.आर ६५५६ चे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे दारूने नशेत चालवून, फिर्यादीचे मोटरसायकलला समोरून बडक देवुन दोघांना गंभीर जखमी करून पळुन गेला, गंभीर जखमी यांना लोकांनी उपचाराकरीता न्यू ईरा हॉस्पीटल येथे नेले असता, उपचारादरम्यान डॉक्टरांनी फिर्यादीचा मित्र नामे कार्तीक यास तपासुन मृत घोषीत केले. फिर्यादीचा उपचार मेयो हॉस्पीटल येथे सुरू आहे.
फिर्यादीचे मित्राचे मृत्यूस मॅक्सी ऑटोचालक कारणीभूत असल्याचे, अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे शांतीनगर येथे सपोनि. एस. के भांड यांनी मॅक्सी ऑटोचालक आरोपीविरूध्द कलम १०५, १२५(अ), २८१, भा.या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.