कन्हान :- हातात तलवार घेऊन व्हिडियो काढुन सोश ल मिडियावर अपलोड करून दहशत निर्माण करणा-या आरोपी सिध्दार्थ लोंढे यास कन्हान पोलीसानी पकडुन त्यांचे विरूध्द पोस्टे ला गुन्हा दाखल केला.
गुरूवार (दि.५) डीसेंबर ला सायंकाळी ७.३० वाजता पोस्टे कन्हान अंतर्गत रामनगर पाधन रोड कन्हान येथे कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलींग करित असता गोपनीय माहिती मिळाली की, सत्रापुर येथे राहणारा सिध्दार्थ संपत लोंढे वय ३५ वर्ष रा. रामनगर कन्हान हा हातात तलवार घेवुन व्हिडीओ काढुन सोशल मिडीयावर अपलोड करून लोकात दहशत निर्माण करित आहे. अशा माहिती वरून मौजा सत्रापुर येथे जावुन सापळा रचुन आरोपीचे हातात तलवार मिळुन आल्याने सदर इसमास शस्त्र बाळग ण्याचा परवाना विचारला असता परवाना नसल्याचे सांगितल्याने आरोपी कडुन एक लोखंडी पात्याची नोकदार तलवार ज्याला स्टीलची मुठ असलेली जिची एकुण लांबी १९.५ इंच, पात्याची लांबी १५ इंच व रूंदी ०१ इंच असलेली जप्त करण्यात आली असुन आरोपी विरूद्ध पोस्टे कन्हान येथे कलम ४, २५ शस्त्र अधिनियम सहकलम १३५ म. पो. अधि. अन्वये गुन्हा दाखल केला आहे.