नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. १ चे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत नागलोक, लोखंडी गेट समोरील, सार्वजनीक रोडवर मोपेडवर जाणाऱ्या संशयीत ईसमास चांबवुन त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे जवळील बोरीमध्ये शासनाने प्रतीबंधीत केलेला मोनोकाईट नायलॉन मांजाचे एकुण १८ चक्री मिळून आल्या. नमुद ईसमास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव शिवराम बकाराम मडाहे वय ५५ वर्ष रा. इंदिरा नगर, वार्ड नं. ४, भिलगाव, नागपूर असे सांगीतले. आरोपीचे ताब्यातून एकूण ७७,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे कृत्य हे कलम २२३ भा.न्या.सं. सहकलम ५. १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम-१९८६, अन्वये होत असल्याने आरोपीविरूध्द पोलीस ठाणे यशोधरानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाईकामी यशोधरानगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा युनिट क. १ वे अधिकारी व अंमलदार यांनी केली.