संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मौदा येथील अभिनंदन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिरवा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर गटसाधन केंद्र मौदा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 (TOT 2.0) यशस्वी घेण्यात आली या दोन्ही टप्प्याच्या प्रशिक्षणाला मौदा तालुक्यातील 570 एकूण शिक्षक यांनी प्रशिक्षण घेतले .
नवीन शैक्षणिक धोरण 2020 राज्य अभ्यासक्रम आराखडा क्षमता आधारित अध्ययन अध्यापन व मूल्यांकन प्रश्न निर्मिती कौशल्य शाळा गुणवत्ता व आश्वासन आराखडा या विविध विषयावर मार्गदर्शन करण्याचा या प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शक म्हणून महेश गिरी, भाग्यश्री लाडे ,नितीन उईके, अनिल आडे ,सचिन लेंडे, प्रेमदास मेश्राम ,लक्ष्मीकांत बांते ,चैतलाल कटरे, गोविंदा भुते , इच्छेंद्र मस्के ,विनोद हुमने ,रिता नेवारे,विक्रम आकरे, उमेश बागडकर , सुनीता चौधरी ,मंगेश कांबळे, यांनी मार्गदर्शन केले प्रत्येक प्रशिक्षणाला गटकार्य व सादरीकरण मार्फत मार्गदर्शन करण्यात आले हे प्रशिक्षण पाच दिवसाच्या दोन टप्प्यांमध्ये आजच पार पडले यशस्वीतेसाठी मौदा पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मा .किरण चिनकुरे मॅडम यांनी विशेष सहकार्य व तालुक्यातील प्रत्येक शाळेत असेच शिक्षण अध्ययन अध्यापन प्रणाली वापरावी याबाबत योग्य व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी संकेत मरसकोल्हे व रामेश्वर भक्तवर्ती तसेच केंद्रप्रमुख जुगलकिशोर बोरकर, राजू आंबिलकर यांनी निरीक्षक म्हणून कार्य केले संचालन शैलेश चांदांकर यांनी केले तर संजय तुळसिकर आभार यांनी समारोपात अभिनंदन विद्यालयाच्या प्राचार्य वैशाली बोरकर मॅडम तसेच अचल तिजारे उपस्थित होते.