यवतमाळ :- निवडणुकीदरम्यान खर्चविषयक तसेच पोलिस, कायदा व सुव्यवस्था विषयक बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाकरीता दोन निवडणूक खर्च निरिक्षक व एक पोलिस निरिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. उमेदवार तथा राजकीय पक्षांना भेटीसाठी या निरिक्षकांनी वेळ राखीव ठेवली आहे.
निखिल कुमार सिंग हे आर्णी, पुसद, उमरखेडचे खर्च निरिक्षक आहे. या मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्ष शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान त्यांना भेटू शकतात किंवा ७६६६०३२८३३ या क्रमांकावर त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.
वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रससाठी अश्विनी कुमार सिंघल हे खर्च निरिक्षक आहे. उमेदवार व राजकीय पक्ष त्यांना शासकीय वन विश्रामगृह, जाम रोड, यवतमाळ येथे सकाळी ९ ते ११ वाजताच्या दरम्यान भेटू शकतात. किंवा त्यांच्यासोबत ७४९९०३९०८९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे निवडणूक उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी एस.के.तिवारी यांची पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे पैनगंगा या सुटमध्ये त्यांना सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान उमेदवार तथा राजकीय पक्षांचे पदाधिकारी भेटू शकतात. त्यांचा संपर्क क्रमांक ८२०८४५४०९९ असा आहे, असे निवडणूक उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.