संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समिती कामठी चे मुख्याधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन सादर
कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या आनंदनगर येथील शीट क्र 11,सर्व्हे क्र वे 20/1 आराजी 2.93 हेक्टर जागेवरील घनकचरा आरक्षण व्यवस्थापन केंद्रसाठी असलेले आरक्षण रद्द करून त्या ठिकाणी स्वास्थ्य उपवन निर्माण करावे या मागणीसाठी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समिती कामठी च्या वतीने आज कामठी नगर परिषद मध्ये मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 15 च्या आनंद नगर येथील सर्व्हे नं 20/1 च्या घनकचरासाठी आरक्षित जागेवर सद्यस्थितीत सर्व्हे नं 29 वर कार्यरत असलेले घनकचरा व्यवस्थापन केंद्र स्थानांतरण करून त्या ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे .
वास्तविकता या सर्व्हे क्र 20/1 च्या परिसर लगतं मोठी लोकवस्ती असून आनंद नगर, यशोधरा नगर, रविदास नगर लागूनच असून औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुद्धा आहे तसेच याच मार्गाने जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल,विपश्यना केंद्र, समाजकार्य महाविद्यालय,भोयर महाविद्यालय तसेच घोरपड आदीकडे जाण्यासाठी हा जलदगती मार्ग असून दैनंदिन नागरिकासह,धार्मिक अनुयायी तसेच विद्यार्थी वर्गाची रेलचेल असते. तेव्हा आनंद नगर च्या सदर आरक्षित जागेवर घनकचरा व्यवस्थापन केंद्र कार्यान्वित केल्यास हा परिसर प्रदूषण युक्त होणार असून यातून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांना बिनधास्तपणे रोगराईचे निमंत्रण मिळणार आहे.जे नागरिकांच्या मानवी आरोग्यास हानिकारक आहे.तेव्हा नागरिकांच्या आरोग्याची काळजी व हित लक्षात घेता सर्व्हे नं 20/1 च्या आरक्षित जागेवर कार्यान्वित होणारा घनकचरा व्यवस्थापण केंद्र ची प्रस्तावित योजना रद्द करून ते आरक्षण रद्द करीत त्या ठिकाणी स्वास्थ्य उपवन निर्माण करावे.या मागणीसाठी सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
हे निवेदन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समिती कामठी च्या मुख्य मार्गदर्शिका माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या मार्गदर्शनार्थ देण्यात आले.याप्रसंगी समितीचे प्रमोद खोब्रागडे, राजेश गजभिये,माजी नगरसेवक विकास रंगारी,गीतेश सुखदेवें, माजी नगरसेवक रघुवीर मेश्राम, उज्वल रायबोले, माजी नगरसेवक लालसिंग यादव ,कोमल लेंढारे,आशिष मेश्राम, राजन मेश्राम,सुमित गेडाम, अविनाश भांगे, प्रणय फुलझेले,रोनीत बोरकर,प्रणय खोब्रागडे,प्रवेश कफकिर्डे,आनंद गेडाम,दिनेश पाटील, सलमान अब्बास, कृष्णा पटेल, सलीमभाई आदी उपस्थित होते.