नागपूर :- फिरते व्यापारी, स्थानिक व्यापारी यांच्या वापरात असलेल्या लोखंडी तराजू, वजने, मापे व इलेक्ट्रॉनिक तराजू यांची त्वरित तपासणी करून घ्यावी. अन्यथा पंधरा दिवसानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे वैधमापनशास्त्र विभागाचे सहनियंत्रक पां. मा. बिरादार यांनी कळविले आहे.
तराजू, वजने व मापे यांची वार्षिक तपासणी करणे कायदे व नियमाप्रमाणे बंधनकारक आहे. कोणतेही नवीन वजन माप खरेदी अथवा दुरुस्ती वैधमापनशास्त्र विभागाच्या परवानाधारकाकडूनच करावी. वजन माप खरेदी करताना सील, शिक्का, बिल व पडताळणी प्रमाणपत्राचा आग्रह धरावा. वजन माप अथवा पॅक केलेल्या वस्तूंबाबत काही तक्रार असल्यास 9404951828 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा व्हाटसअप संदेश पाठवावा, असे आवाहन वैधमापनशास्त्र विभागामार्फत करण्यात आले आहे.