लातूर ते नांदेडपर्यंतच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- लातूर – नांदेड ब्रॉडगेज रेल्वे मार्ग हा मराठवाड्यातील प्रमुख शहरे लातूर व नांदेडला रेल्वे मार्गाने थेट जोडण्यासाठीचा प्रकल्प आहे. या रेल्वे प्रकल्पाची लांबी 91.3 कि.मी.असून अंदाजे किंमत 3 हजार 12 कोटी एवढी आहे. लातूर ते नांदेड थेट विद्युतीकरणासह नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्पाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

यासंदर्भात विधानसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्याच्या ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी आणि हे प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावेत या उद्देशाने निवडक रेल्वे प्रकल्पामध्ये प्रकल्प खर्चाच्या 40 ते 50 टक्के आर्थिक सहभाग देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. या रेल्वे मार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य राजेश पवार, प्रशांत बंब, बालाजी कल्याणकर, अनिल देशमुख, देवयानी फरांदे यांनी सहभाग घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे सदोष माल पुरवठा केल्याबद्दल तक्रार नाही - मंत्री रवींद्र चव्हाण

Fri Mar 24 , 2023
मुंबई :- अहमदनगर येथील शेतकऱ्यांनी क्रिती इंडस्ट्रीज इंडिया यांच्याविरुद्ध अहमदनगरच्या तक्रार निवारण आयोग आणि राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे सदोष मालाचा पुरवठा केल्याबाबत कोणतीही तक्रार केल्याचे आढळून आले नसल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. विधानसभा सदस्य प्राजक्त तनपुरे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 अंतर्गत राज्यस्तरावर आणि प्रत्येक जिल्हास्तरावर ग्राहक तक्रार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!