शनिदेवाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- शनिदेवाच्या जन्मोत्सवाला शनिदेवाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात.शनिदेवाच्या कृपेने आर्थिक,मानसिक आणि शारीरिक लाभ होतात. व्यक्तीच्या जिवनात शनिदेवाचा प्रभाव खूप प्रगल्भ जाणवतो.शनी जयंतीला शनिदेवाची पूजा केल्याने कुंडलीतील शनी साडेसाती आणि धैर्याचा अशुभ प्रभाव कमी होत असल्याचे मौलिक प्रतिपादन माजी मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनालपुरा कामठी येथे श्री शनिदेव जन्मोत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.याप्रसंगी श्री शनी जन्मोत्सव समिती हमालपुरा कामठी चे पदाधिकारी व माजी नगरसेवक कपिल गायधने, श्री शनीदेव जन्मोत्सव समितीचे समस्त पदाधिकारी व सदस्यगण, भाजप शहराध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट, पंकज वर्मा,विजय कोंडुलवार ,माजी नगरसेवक राजू पोलकमवार,सतीश जैस्वाल,रजत यादव आदी उपस्थित होते.

हमालपुरा येथील श्री शनी जन्मोत्सव समिती कामठी च्या वतीने शनिदेव मंदिरात भगवान श्री शनिदेव जन्मोत्सव आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमा अंतर्गत 6 जून ला शनिदेव मंदिरात सकाळी 8 वाजता तेलभिषेक करण्यात आला तर रात्री 8 वाजता महाआरती करण्यात आली.याप्रसंगी मोठ्या संख्येत भक्तांनी सहभाग दर्शविला होता तर 8 जून ला भव्य महाप्रसाद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महाप्रसादाचा हजारो च्या संख्येतील नागरीकानी आस्वाद घेतला.भगवान श्री शनिदेव जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने भक्तिमय वातावरणात पार पडला असून यशस्वीतेसाठी श्री शनीदेव जन्मोत्सव समिती हमालपुरा कामठी चे समस्त पदाधिकारी व सदस्यांनी मोलाची भक्तिमय भूमिका साकारली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराणा प्रताप यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

Sun Jun 9 , 2024
नागपूर :- राजपूत वंशातील पराक्रमी राजे महाराणा प्रताप यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात नायब तहसिलदार आर.के.डिघोळे यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com