नागपूर :-श्री अयोध्या नगरी येथे प्रभू श्री राम चंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार असून, या शुभ कार्याचे औचित्य साधून, दक्षिण-पश्चिम मंडळाचे महामंत्री, माजी शिक्षण सभापती व माजी नगरसेवक प्रा. दिलीप दिवे यांनी दिनदर्शिका. या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार प्रविण दटके, दक्षिण-पश्चिम मंडळाचे अध्यक्ष रितेश गावंडे, किशोर वानखेडे, नितीन महाजन, कल्पना तडस, वर्षा चौधरी, प्रदीप चौधरी, राजेंद्र अग्रवाल, संदीप कुलकर्णी, काजल बागडी, मेधा पंडित, प्रणालि धर्माधिकारी, धनंजय तापस, जीवन मुदलियार, राम सुब्रम्यम, प्रीती शुक्ला, विनोद पांडे, अक्षय जोध, सनी पांडे, सिद्धेश नाजपांडे आदि कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.