नागपूर, ०५ जानेवारी : महा मेट्रो नागपूर अंतर्गत कस्तुरचंद पार्क -सिताबर्डी इंटरचेंज-खापरी मेट्रो स्टेशन आणि सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान २६.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होत असून लवकरच १३.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होणार आहे. यात सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.५ किमी आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन ते आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन ५ किमी मार्गिकांचा समावेश आहे.
या सोबतच महा मेट्रो नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या मेट्रो स्थानकांवर मोठ्या प्रमाणात भाडे पट्टे या तत्वावर व्यवासायिक उपक्रमाकरिता १५ वर्षाच्या कालावधी करिता नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या खापरी मेट्रो स्टेशन,न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन,एयरपोर्ट मेट्रो स्टेशन,उज्जवल नगर मेट्रो स्टेशन,जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन,छत्रपती चौक मेट्रो स्टेशन,काँग्रेस नगर मेट्रो स्टेशन,सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन व गड्डीगोदाम चौक मेट्रो स्टेशनवरील बिल्ट-अप स्पेसच्या वापराचा परवाना या व्यतिरिक्त नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रिच -१ आणि रिच – ३ मधील निवडक मेट्रो स्टेशन वर १०० चौ. मी पेक्षा कमी जागेवर ९ वर्षाच्या कालावधीकरिता व्यवसाय करण्यासंबंधीचा परवाना संबंधीच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत.
महत्वपूर्ण आहे कि,महा मेट्रोने १५ वर्षांकरिता मागविण्यात आलेल्या निविदा मोठ्या व्यावसायिक करता उपलब्ध असून यामध्ये एकूण २४ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत तसेच या निविदेचा कालावधी १५ वर्षा नंतर पुनः मागवितांना या व्यावसायिकाना प्रथम प्राधान्य दिल्या जाणार आहे. तसेच लहान व्यावसायिकांनकरिता ९ वर्षाच्या कालावधीकरिता मागविण्यात आलेल्या निविदेमध्ये जवळपास ६७ दुकाने आहेत.
महा मेट्रोने या पूर्वी मागविण्यात आलेल्या निविदेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून झिरो माईल फीडम पार्क मेट्रो स्टेशन येथील इलेव्कट्रोनिक मार्केट तसेच झासी राणी चौक, सुभाष नगर व लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथील व्यावसायिक जागांना प्रतिसाद मिळत या ठिकाणची सर्व दुकाने विकल्या गेली आहेत.
मेट्रो स्थानकांवर उपलब्ध करण्यात आलेल्या जागेसंबंधी माहिती करिता नागपूर मेट्रोच्या प्रॉपर्टी डेव्हलपमेंट विभागाशी संबंध साधावा असे आवाहन महा मेट्रो करित आहे.
महत्वपूर्ण म्हणजे महा मेट्रोने ५०% महसूल हा नॉन फेयर बॉक्सच्या माध्यमाने अर्जित करण्याचा महत्वकांक्षी लक्ष निर्धारित केले आहे. महा मेट्रोने नेहमीच नॉन फेयर बॉक्सवर लक्ष केंद्रित केले असून स्टॅम्प ड्युटी, टीओडी पॉलिसी, पीडी आणि स्टेशन नेमींग राइटस अश्या विविध योजनाचा या मध्ये समावेश आहे.भविष्यातील गरजा बघता महा मेट्रोने नॉन फेयर बॉक्स फक्त नियोजन केले नसून प्रत्यक्ष आवश्यकतेनुसार अंबलबजावणी देखील करीत आहे.