अमरदिप बडगे
आगीत धानाचे २०० पोते सह 6 बकऱ्या जळाल्या 5 लाखाचे जवळपास नुकसान
गोंदिया – गोंदिया जिल्हातील आमगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या नंगपुरा येथील शेतकरी दशरथ टेंभरे यांच्या परिवारातील तीन भावाच्या गोठयाला रात्रीच्या सुमारास विज पडून गोठ्याला आग लागल्याने तीनही भावाचे गुरांचे गोठे आगीत भस्मसात झाले. असुन या तीन गोठ्यात २०० च्या जवळ पास असलेले धानाचे पोते, शेतीची अवजारे, आणि ६ बकऱ्या या आगीत जळून भस्मसात झाल्याची घटना घडली आहे.
जवळ पास ५ लाखाचे नुकसान झाले असून वेळीच सावध झाल्याने येथे राहणाऱ्या लोकांचा जीव वाचविण्यात यश आले. तरी मात्र त्याठिकाणी ठेवलेले सर्व साहित्य आणि कागदपत्र जळल्याची माहीत प्राप्त होत आहे. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, मात्र तोपर्यंत धान्य आणि जनावरे जळून खाक झाली होती. या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.