नागपूर :- पोलीस ठाणे कळमणा हद्दीत प्लॉट नं. २०, सुर्यनगर, गुरुद्वारा समोर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी अनिल रामचंद औचल, वय ५२ वर्षे, हे त्यांचे घराला कुलूप लावून परिवारासह नातेवाईकांनी आयोजीत केलेल्या वाढदिवसाचे कार्यक्रमाकरीता उमरेड रोड, डायनींग हॉल येथे गेले असता, दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे ग्राऊंड फ्लोअर वरील स्लाईडॉग विंडोची काच सरकवुन, घरात प्रवेश करून, दुसरे माळयावरील बेडरूम मधील लाकडी कपाटाचे लॉक तोडुन सोन्याचे वेगवेगळे दागीणे, सोनेजडीत हिण्याचे दागिने तसेच प्लॅटीनीयमचे वेगवेगळे दागिने असा एकुण २४,५३,०२९/- रू. या मुद्देमाल चोरून नेला, फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कळमणा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याने समांतर तपासात गुन्हेशाखा घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून, परिसरातील एकुण ३५० सि.सी.टी.व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून, परफोडी करणारा आरोपी हा रेकार्ड वरील भरफोडी करणारा गुन्हेगार नरेश महिलांग असल्याची खात्री करून, मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रघुन नमुद आरोपीस नागपूर ग्रामीण हद्दीतील खेडी गावातील श्रीजी ले-आउट जवळील, सिमेंटच्या पाईप जवळुन नशा करत बसलेला आरोपी नरेश अंकालू महिलांगे वय ३४ वर्ष, रा. पुंजारामवाडी, डिप्टी सिग्नल, गल्ली नं. ११. कळमणा, नागपूर पास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा त्याने पाहिजे आरोपी ईतर ०३ साथिदारासह केल्याचे सांगीतले. आरोपीची अधिक सखोल विचारपूस केली असता त्याने यागुन्हयाव्यतीरिक्त पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत ०४, लकडगंज-०३, गणेशपेठ ०१. कोतवाली हदीत ०१. वाठोडा -०१, कोराडी-०१, यशोधरानगर-०१, पारडी-०१, पोलीस ठाणे खापरखेडा-०२, मौदा-०१ व लोधीखेडा मध्य प्रदेश ०१ असे एकुण १८ घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली, आरोपीचे ताब्यातून रोख २,३५,०००/- रू., एक आय २० हुंडई कार, एक जाळालेली हुंडई कार, ०२ मोटरसायकल, ०१ मोबाईल फोन, एक पांढऱ्या धातुची पट्टी असा एकुण किंमती अंदाजे ८,२०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीस मुद्देमालासह कळमणा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
यातील वर नमुद आरोपी हा अंतरराज्यीय सराईत घरफोडी/वाहन चोरी/दुकानफोडी करणारा अट्टल गुन्हेगार असुन त्याचेवर महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेश व इतर राज्यात त्याने विरुध्द १०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, व तो ७ गुन्हयामध्ये पकड वारंट मध्ये पाहीजे आरोपी आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांने मार्गदर्शनाखाली, पोनि. अमोल देशमुख, सपोनि. नितीन चुलपार, पोहवा, राजेश देशमुख, हंसराज ठाकुर, प्रशांत गभणे, प्रविण रोडे, रवि अहिर, निलेश श्रीपात्रे, सुधीर पवार, आशिष वानखेडे, पकंज हेडाऊ, मनोज टेकाम, प्रितम यादव, स्वप्नील खोडके, सायबर सेलचे पोउपनि, झिंगरे, पोअं. पराग डोक, अनंता क्षिरसागर, धिरज पंचभावे, शेखर राघोर्ते यांनी केली,