संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या छत्रपती नगर येथील एका कुलुपबंद घरातून अज्ञात चोरट्याने घरात कुणी नसल्याचे संधी साधून घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटात सुरक्षित ठेवलेले नगदी 30 हजार रुपये व 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 95 हजार रूपयाची घरफोडी केल्याची घटना नुकतीच घडली असून यासंदर्भात फिर्यादी निलेश चिंचखेडे वय 40 वर्षे रा छत्रपती नगर कामठी ने स्थानिक पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 457,380 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.