संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
नगदी रूपये आणि सोन्याचे दागिन्या सह एकुण ४५ हजार रूपयाची चोरी.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि टेकाडी वसाहती मागील भागात कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून नगदी रूपये आणि सोन्याचे दागिन्या सह एकुण ४५,००० रुपयांची घरफोडी करून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून पो .स्टे.ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.
कन्हान शहर व ग्रामिण भागात मागील अनेक दिवसा पासुन चोरी, घरफोडी, मारपिट, लुटमारी ची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असुन सुध्दा कन्हान पोलीस प्रशासन होणाऱ्या घटनांवर अंकुश लावण्यात आणि गुन्हेगारांना पकडण्यात अपयशी ठरून गुन्हेगारांचे हौंसले बुलंद होत असल्याने कन्हान थानेदार विलास काळे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाले असुन उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. प्राप्त माहिती नुसार प्रदिप मारोतराव विलायतकर रा.टेकाडी हे मागील १७ वर्षापासुन नागपुर ला अमेरिकन ट्राॅवर कंपनी (एटीसी) येथे टेक्नीसीयल म्हणुन काम करीत असुन शनिवार (दि.३) सप्टेंबर ला प्रदिप विलायतकर यांची पत्नी आणि मुले हे धामनगाव जि.अमरावती येथे महालक्ष्मी कार्यक्रमास गेले होते. रविवार (दि.११) सप्टेंबर ला दुपारी ३ वाजता प्रदिप हे आपल्या घराला कुलुप लावुन कामावर गेले असता दुसऱ्या दिवशी सोमवार (दि.१२) सप्टेंबर ला सकाळी ६ वा. कामावरून घरी परत आले असता त्यांना घराचे कुलुप तुटलेले दिसल्याने घराच्या बेडरूम मधिल कपाटाचे दार उघडुन पाहणी केली. तर त्यात ठेवलेले नगदी अंदाजे ७,००० रूपये व गुल्लक मध्ये ठेवलेले नगदी अंदाजे ३,००० रूपये तसेच १) कानातील सोन्याच्या धातुचे डुल वजन ५ ग्रॅम, २) नाकातील सोन्याची नथ वजन ४ ग्रॅम ३) सोन्याची चैन वजन ५ ग्रॅम असे जुने वापरातील सोन्याचे दागिने वजन १४ ग्रॅम असा एकुण ३५ हजार आणि नगदी १०,००० रूपये असा एकुण ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांने घरफोडी करून चोरून नेल्याने कन्हान पो.स्टे.ला फिर्यादी प्रदिप विलायतकर यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशनचे थानेदार विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.