संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी घोरपड रोड सोसायटी येरखेडा येथील एका कुलूपबंद घरात अज्ञात चोरट्याने अवैधरित्या प्रवेश करून घरातील 80 हजार रुपयांच्या मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज 26 फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता सुमारास उघडकीस आली नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा सुधाकर सिंग वय 46 वर्ष राहणार फ्लॅट नंबर 7 जमील सोसायटी मढी मंदिर जवळ घोरपड रोड येरखेडा हे घराला कुलूप लावून दिनांक 16 फरवरी ला गुजरात येथे नातेवाईकाकडे लग्न सोहळ्यासाठी गेले होते अज्ञात चोराने घराच्या छतावरून घरात येऊन घराचे मुख्य प्रवेशद्वार तोडून घरात प्रवेश करून बेडरूम मधील कपाट फोडून कपाटातील नगदी 20 हजार रुपये व 60 रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लपास केले आज 26 फरवरी 2025 रोज गुरुवारला सकाळी अकरा वाजता सुमारास क्रिशाना सिंग घरी आले असता त्यांना घराचे मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले दिसून आले घरात प्रवेश केल्यावर कपाट फोडलेले दिसून आले सामान व्यस्त पडलेले दिसून आले असता कपाटातील 20 हजार रुपये नगदी व सोन्या चांदीचे दागिने एकूण 80 हजार रुपयांच्या मुद्देमाल अज्ञात चोराने घेऊन पसार झाले कृष्णा सिंग यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठून घरफोडीची तक्रार केली असता नवीन कामठी पोलिसांनी बीएनएस कलम 305 (अ) ,331 (3) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नवीन कामठीचे ठाणेदार महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सृष्टी कदम करीत आहेत.