नागपूर :- दिनांक ०५.०८.२०२३ ला पो. ठाणे हुडकेश्वर हद्दीत, रघुजीनगर पोलीस क्वॉटर नं. २९८/३ हुडकेश्वर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी व्यंकट हरिभाऊ गंधाळे वय ३९ वर्षे हे आपले घराचे मुख्य दाराला कुलूप लावून पत्नीसह बुट्टीबोरी येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करून, घरातील आलमारीतून सोन्याचे दागीने किंमती अंदाजे ३,०४,०००/- रू मुद्देमाल चोरून नेला. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे हुडकेश्वर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान, हुडकेश्वर पोलीसांना मिळालेले खात्रीशीर माहितीवरून आरोपी क. १) नयन नवनाथ चवरे वय २२ वर्ष, रा. पाचनल चौक, रामबाग, ईमामबाडा, यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याने सदर घरफोडी त्याचे साथीदार दोन विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत मिळून केल्याची कबुली दिली. व गुन्हयातील मुद्देमाल आरोपीचे नातेवाईक आरोपी २) स्मीता प्रेम ढोले वय ३६ वर्ष रा. ईमामवाडा, नागपूर, यांचे मार्फत विक्री करण्यात आल्याचे सांगीतल्याने आरोपी क. १ यास अटक करून आरोपी क. २ व २ विधीसंघर्षग्रस्त बालक यांना सूचनापत्र देवुन गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपी कडुन गुन्हयात चोरी गेलेले दागिने व गुन्हयात वापरण्यात आलेली अॅक्टीव्हा गाडी असा एकूण ३,०१,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग नागपुर शहर, पो. उप आयुक्त विजयकात झोन ०४ मा सहापी, आयुक्त डॉ. गणेश बिरादार , अजनी विभाग, यांचे मार्गदर्शनात वरीष्ठ सागर, पोलीस निरीक्षक जवेन्द्रसिंग राजपुत, पोनि गुन्हे विकांत संगणे, पोउपनि प्रमोद खंडार, पोहवा मनोज नेवारे, संदीप पाटील, शरद चौव्हान संतोष सोनटक्के, नापअ विजय सिन्हा, दिनेश गाडेकर, राहुल इंगोले, मंगेश मडावी यांनी केली.