नागपूर :- देशातील गरीब, महिला, युवा, अन्नदाता अर्थात शेतकरी आणि मध्यमवर्गाला न्याय देणारा अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात नागपूर शहरातील नाग नदी सुधार प्रकल्पासाठी 295.64 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकारने नागपूर शहरासाठी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून देशातील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, महिला, शेतकरी, युवा यांच्या उत्थानावर भर दिला आहे. शेतकरी आणि शेतीच्या उत्थानासोबतच शैक्षणिक बळकटीकरणाकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. देशात देशाची युवाशक्ती सशक्त करण्याकडे सरकारने विशेष लक्ष दिले आहे. देशातील प्रत्येक वर्गाचा सर्वांगीण विकास करून त्यांना सशक्त बनवून देशाच्या बळकटीकरणाची दूरदृष्टी असलेला संकल्प ऐतिहासीक आणि पथदर्शी आहे.