– केंद्र सरकारचे पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे अभिनंदन
नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. हा अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, रोजगार, करात सवलत, आत्मनिर्भर भारत, लघुउद्योगांना पाठबळ, वंचित घटकांना प्राधान्य, उद्योग आणि शेतीसाठी पायाभूत सुविधांसह कौशल्य योजनांद्वारे युवा सक्षमीकरणासह देशाच्या प्रगतीवर अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदीं सरकारचा अर्थसंकल्प हा महाशक्ती भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रीया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचे हित जपणारा, देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, विकसित भारताची पायाभरणी करुन देशवासियांची मन जिंकणारा आहे. अर्थमंत्री सितारमण यांनी कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये कृषी क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार आणि क्षमता विकास, एकूणच मानव संसाधन विकास, सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा, नवोपक्रम, संशोधन आणि विकास, पुढील पिढीतील सुधारणा या घटकांना प्राधान्य दिले आहे. गरीब, तरुण, महिला, शेतकरी अशा महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. रोजगार, कौशल्य, एमएसएमई, मध्यमवर्गावर सतत लक्ष केंद्रित केले आहे. रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित पाच योजनांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे बजेटमध्ये करून युवा वर्गाला सक्षमीकरणाची वाटचाल यामुळे होणार असल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले.
4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्याचे काम अर्थमंत्री यांनी केले आहे. तसेच शिक्षण, रोजगार आणि कौशल्यांसाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. याचा फायदा आर्थिक आघाडीवर 80 लाखांहून अधिक लोकांना होणार आहे. पंतप्रधानांनी रोजगार, कौशल्य प्रशिक्षण यासाठी पाच योजनांचे पॅकेज जाहीर केले. याचा फायदा पाच वर्षांत 4 कोटी 10 लाख तरुणांना होणार आहे. शेतकरी, युवक उद्योजक, गरीब मध्यमवर्गीय महिला अशा सर्व समजाघटकांना बळ देतानाच देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भक्कम पावले टाकनारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केला. भारताला विकसित देश करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प आहे, जयदीप कवाडे यावेळी म्हणाले. पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले आहे.