अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 ते 25 मार्चपर्यंत

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई, दि. 15 :- महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून दि. 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थित) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

सन 2022-23 या वर्षाचा अर्थ संकल्प दि. 11 मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधकारक आहे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उच्च न्यायालयात एसबीसी घटकाची बाजू भक्कमपणे मांडू :- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

Tue Feb 15 , 2022
विशेष मागास प्रवर्गातील आरक्षणाबाबत बैठक  मुंबई, दि. 15 :  राज्यात विशेष मागास प्रवर्गाचे  दोन टक्के आरक्षण संरक्षित करण्यासाठी शासन  भक्कमपणे उच्च न्यायालयात एसबीसी घटकांची बाजू मांडेल त्यासाठी विशेष अभियोक्त्याची नियुक्ती करण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात विशेष मागास प्रवर्गातील आरक्षणाबाबतच्या बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री.वडेट्टीवार बोलत होते.यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार,सामान्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com